Tuesday, 11 August 2020

रामोशांचा उठाव

  कालखंड :- इ.स. 1826 ते 1829

  नेतृत्व :- उमाजी नाईक

  मुख्य ठिकाण :- महाराष्ट्रातील पर्वतीय प्रदेश

🖍 पश्चिम महाराष्ट्रातील उमाजी नाईक याने इंग्रजांच्या काळातील आर्थिक परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या

🖍रामोशी जमातींना संघटीत करुन इंग्रजी सत्तेविरुध्द बंडाचे निशाण उभारले.

🖍उमाजींचा इंग्रजांशी पहिला संघर्ष हा ‘पांढरदेव’ च्या डोंगरावर झाला.

🖍 कामधंदा करण्यापेक्षा ही जमात दरोडा, चोऱ्या, लुटमार, खून या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करीत असे.

🖍परंतु काही रामोशी राखणदार, किल्यांवरील पाहणी तसेच सैन्यामध्ये लढाई करणे हे देखील काम करीत असे.

🖍 उमाजी नाईक व त्याचा सहकारी बापू त्रिंबकजी यांनी काही काळ इंग्रजांना पर्वतीय भागात संतप्त
करुन सोडले होते तसेच जमीनदार, सावकार व महसूल अधिकारी यांच्यावर प्रखर हल्ले करुन लुटालुट केली.

🖍 इंग्रजांनी कॅप्टन ॲलेक्झांडर व मॅकिन्टॉश यावर उमाजी नाईकला पकडण्याची जबाबदारी सोपविली.

🖍 अखेर भरपूर प्रतिकारानंतर उमाजी इंग्रजांच्या ताब्यात सापडला गेला. मात्र उमाजींच्या नेतृत्वाखाली संघटीत झालेल्या रामोशींची लढाई वृत्ती बघून इंग्रजांनी त्यातील अनेकांना जमीनी वापस केल्या तर काहींना पोलीस दलात नोकरी देखील दिली.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...