Friday, 12 January 2024

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे



●1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन


●1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी


●1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष


●1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष


●1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष


●1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.


●1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.


●1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.


●1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.


●1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.


●1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.


●1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.


●1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.


●1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


●1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.


●1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.


●1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.


●1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

No comments:

Post a Comment