Saturday 8 August 2020

इंग्रज सरकार विरुध्दच्या या उठावात भारतीयांना आलेल्या अपयशाची प्रमुख कारणे



🖍 हा उठाव स्थानिक स्वरुपात, मोजक्याच क्षेत्रात, मर्यादीत प्रमाणात व असंघटीत असा होता.

🖍 तसेच भारतातील एेक्याचा अभाव हे देखील या उठावाच्या पराभवाचे मोठे कारण होते.

🖍  इंग्रजांच्या लष्करातील जवळपास अर्धेहिंदी सैनिक इंग्रजांच्याच बाजूने लढले, तसेच शिखांनी देखील इंग्रजांना साथ दिली.

🖍  सिंध, राजपुताना, पंजाब, काश्मिर, मुंबई, मद्रास या प्रांतातील जनता, शासक तसेच संस्थानिक यांनी या उठावात सक्रिय सहभाग न घेता ते शांत राहिले.
🖍   शिवाय शेतकरी तसेच खालच्या जातीतील लोकांनीही या उठावात सक्रिय भाग घेतला नाही.

🖍   पातियाळा, जिंद, ग्वाल्हेर, हैद्राबाद येथील राजांनी हा उठाव दडपून टाकण्यास सरकारला उघड सहकार्य केले.

🖍  या उठावाचा जास्त प्रभाव केवळ पश्चिम बिहार, अवध, रोहिलखंड, दिल्ली तसेच नर्मदा व चंबळ नद्यांमधील प्रदेश येथेच जाणवला.

🖍   उठावकर्त्यांच्या तुलनेने इंग्रजांकडे विपुल साधन सामग्री होती. उठावाला शिपायांजवळही फारच थोड्या बंदुका होत्या व तलवारी आणि भाले हिच भारतीयांची मुख्य शस्त्र होती.

🖍   आधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने तसेच तारायंत्राच्या सुविधेमुळे उठाव दडपून टाकण्यासाठी एक सार्वत्रिक योजना बनविण्यात इंग्रज सफल झाले व अनुभवी अधिकाऱ्यांच्या रुपात कंपनी जवळ योग्य नेतृत्वही होते.

🖍   या उठावाचे संघटन भारतीयांनी नियोजनबध्द पध्दतीने केले नव्हते. उठावात भाग घेणारे नेते शूर होते, परंतु संघटन क्षमता, अनुभव व परस्पर सहकार्याने काम करण्यात ते कमी पडले, तसेच त्यांच्यामध्येनेतृत्व गुणांचा देखील 
अभाव होता.

🖍   कुवरसिंह व मौलवी अहमदुल्ला यांचा अपवाद वगळता प्रत्येकजण हे केवळ आपल्या क्षेत्रातच लढले.

No comments:

Post a Comment