Thursday, 6 August 2020

मानवाच्या इतिहासातील दुर्दैवी दिवस

आज 6 ऑगस्ट. आजच्याच दिवशी दुसऱ्या महायुद्धात जपानमधील 'हिरोशिमा' शहरावर मित्र राष्ट्रांनी अणुबॉम्ब टाकून या शहरास बेचिराख केले.  

अणुबॉम्बच्या विध्वंसक परिणामामुळे हिरोशिमा शहरात मोठी जीवित हानी झाली. या दुर्दैवी घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. याबाबत काही घडामोडी जाणून घेऊयात.

शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी पदार्थाला शक्तीमध्ये व शक्तीला पदार्थात द्रव्यशक्ती समीकरणाद्वारे परावर्तीत करणे शक्य असल्याचा सिद्धांत मांडला.

दुस-या महायुद्धापूर्वी शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांच्याकडून प्रेरणा घेऊन शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट ओपेनहाइमर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.

या कार्यात जर्मनी, युरोप आणि अमेरिकेच्या प्रमुख वैज्ञानिकांचा सहभाग होता. अथक परिश्रमानंतर १३ जुलै १९४५ ला एलामोगेडरोच्या वाळवंटात या अणुबॉम्बची चाचणी घेण्यात आली.

या चाचणीत भल्यामोठ्या ज्वालाचा स्फोट होऊन एक मैल त्रिज्येतील जीवजंतू मृत्युमुखी पडून ९ मैलापर्यंत ज्वालांची उष्णता पसरली.

त्यानंतर दोन बॉम्बच्या निर्मितीचा निश्चय करण्यात आला. त्यापैकी एक अणुबॉम्ब हिरोशिमा शहरात टाकण्यात आला.

६ ऑगस्ट १९४५ हा मानवाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी दिवस. मित्र राष्ट्रांनी जपानमधील 'हिरोशिमा' शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकून जग स्तब्ध केले.

अणुबॉम्बचा प्रभावामुळे तीन लाख वस्तीचे शहर क्षणात नष्ट झाले. विज्ञानानेच मानवाच्या आत्मविश्वासावर केलेला तो मोठा हल्ला होता.

मानवाच्या क्रुरतेपुढे मानवाच्या साहस व शौर्याला पराजय पत्करावा लागला. जपानने या बॉम्ब हल्ल्यानंतर शरणागती पत्करली.

हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब हा युरेनियम गन टाईप अ‍ॅटोमिक बॉम्ब होता. त्याचा स्फोट या शहराच्या २००० फूट उंचावर झाला.

हिरोशिमाचा पाच चौरस मैल भाग नष्ट होऊन निम्मे लोक बॉम्ब टाकलेल्या दिवशीच मरण पावले. तदनंतरच्या महिन्यात अनेक जखमी उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे मृत्यू पावले.

या बॉम्बस्फोटानंतर जगभरात संतापजनक तीव्र पडसाद उमटले, या बॉम्बचे जनक डॉ. ओपेनहाईमर यांनी आपला राजीनामा देऊन मानवतेचा संदेश जगास दिला. 

त्यानंतर जगभरात आण्विक शस्त्रास्त्र कमी करण्यासाठी मॉस्कोत एक करार करून अणुबॉम्बच्या भूमिगत चाचण्यास संमती देऊन हवा व पाणी या चाचण्यांस विरोध करण्यात आला.

No comments:

Post a Comment