२० ऑगस्ट २०२०

'स्पेस एक्स'ची कुपी अवकाशवीरांसह माघारी



▪️अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन अवकाशवीरांसह परत येत आहे.

▪️खासगी कंपनीच्या माध्यमातून नासाने अवकाशवीर पाठवणे व त्यांचे परत पृथ्वीवर येणे या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच घडत असून ही अवकाश कुपी पृथ्वीवर सुरक्षित उतरवण्यासाठी स्पेस एक्स कंपनी मार्गदर्शन करीत आहे.

▪️मक्सिकोच्या आखातात रविवारी दुपारी ही कुपी अवतरण करणार असून दोन महिन्यांच्या अवकाश वास्तव्यानंतर ती परत येत आहे.

▪️ही कुपी उतरवण्यासाठी मेक्सिको आखाताची निवड करण्यात आली आहे, कारण फ्लोरिडातील किनाऱ्यावर एक उष्णकटीबंधीय वादळ आहे.

▪️अवकाश वैमानिक डग हर्ले व बॉब हेनकेन हे दोन अमेरिकी अवकाशवीर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात स्पेस एक्सच्या ड्रॅगन अवकाशकुपीतून गेले होते.

🛑 ताशी २८ हजार कि.मी. वेगाने परतीचा प्रवास

▪️डरॅगन अवकाशकुपीला आता एंडेव्हर नाव देण्यात आले असून तिचा वेग पृथ्वीकडे येताना ताशी २८ हजार कि.मी असेल.

▪️तो वातावरणात येईपर्यंत ताशी ५६० कि.मी पर्यंत खाली आणावा लागेल.

▪️तयानंतर ही कुपी सागरात पडताना तिचा वेग ताशी २४ कि.मी राहील. परत येताना अवकाशकुपीचे तापमान १९०० अंश सेल्सियस राहील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२३ एप्रिल २०२५ टॉप १० चालू घडामोडींचे MCQ

१. भारताच्या नवीन अ‍ॅथलीट पासपोर्ट युनिटला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? ए.आय.ओ.सी. बी. युनेस्को सी. वाडा डी. नाडा उत्तर: सी. वाडा २. ...