०६ एप्रिल २०२३

माझ्या भावी अधिकारी मित्र आणी मैत्रीणीनो...



अभ्यास....अभ्यास....अभ्यास... करत असालच तर मनात कुठलीही भिती बाळगू नका... हरवलेला आत्मविश्वास शोधा त्याला आता बाहेर काढा... माहिती आहे मला की, अधिकारी होण्याचे स्वप्नं पाहणार्या मुलिंना अनेक मर्यादा आहेत आणी मुलांना बंधना सोबत अनेक जबाबदारी आहेत... आणी त्यात आयोगाचे पेपर पुढे ढकलले गेले आहेत याच डिप्रेशन येतय..! पण विद्यार्थी ना तुम्ही हे विसरून कस चालेल ? जरा शोधा बरं विद्यार्थी म्हणजे काय ? याचा उत्तर... "कुठल्याही ज्ञानाच्या धर्तीवर, विवेक बुद्धीने ज्ञान धारण करुन जगणारा म्हणजे विद्यार्थी. " मग तुम्हाला न्याय देता यायला हवा या विद्यार्थी दशेला...

त्यासाठी विद्यार्थी हा उताविळ नसावा तर तो संयमी, चिकित्सक, जिद्दी, ध्येयवाडी, प्रामाणिक आणी आत्मविश्वासू असावा. मागेच अयोगाने वेळापत्रक प्रसिद्ध केले आणी सगळेच जोमाने सिद्धत्वाच्या वाटेवर धावू लागले.. त्यात कालच बातमी धडकली की, " आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्या..! " हे ऐकल आणी अनेक विद्यार्थी थबकले. काही लगेच तणावग्रस्त झाले. काही तर अक्षरशः व्हाटसअप, फेसबूक आणी सोशल मिडियावर ट्रोल करत आपल्यातला असंयमी विद्यार्थी प्रदर्शन करत निघाले. आयोग म्हणजे आज तमाम भावी अधिकारी वर्गाचे एक असे मंदिर आहे. जे तुम्हाला तुमच्या आयुष्याला प्रामाणीकपणाने न्याय देत आले आहे आणी देत आहे देत राहील...

मग तुमचा संयम जर आज फक्त परीक्षा पुढे ढकलल्या म्हणून जर सुटत असेल तर, ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल... मित्रांनो जरा धीर धरा.. ही तूमच्या संयमाची परीक्षा आहे. त्यात यशस्वी व्हा. कारण संयम मातृत्व बहाल करतो. मग कोणते मातृत्व तर जिद्द, इच्छाशक्ती, आत्मविश्वास यांसारखी अनेक सामर्थ्यशील गुण संयमच जन्माला घालतो. मग बघा तुम्ही कुठल्या तणावात जगत आहे.. सोडा आता तरी त्या तणावाचे दार
..ह्वा तिथून फरार... आणी ठोठवा विवेक बुद्धीचे दार... शोधा तुमचे दोष, वाढवा तुमचा अभ्यासाचा व्यासंग... परीक्षा पुढ ढकलल्या गेल्या म्हणून टेंशन आले. ही कारण तुम्ही तुमच्या अपयशाला देऊ शकत नाही. पण परिक्षा आणी तुमच्यात पडलेल अंतर परिवर्तीत करा तुमच्या आत्मविश्वासात...

 वेळ वाया जातोय ही कारण तुमच ध्येय सिद्ध होईपर्यंत तुमचा वेळ वाया जातोय अस जिथ कुठ वाटेल ना तिथ थोड थांबा...! बघा आतमधे डोकाऊन मग मिळेल एक उत्तर की, वेळ वाया जात नाही तो आपण घालवतो आहे..! म्हणून संयम बाळगा...! देशाच्या जवानांसारखी तयारी ठेवा..! युद्धाची मानसीक व शारीरिक तयारी ते एका दिवसात नाही पुर्ण करत. ती तयारी ते रोजच करत असतात. म्हणून ते खचत नाही. अपयशाचा विचारही ते कधीच करत नाही. कधी समोरुन क्षत्रूची गोळी येईल आणी रक्त पिऊन कायमची घेऊन जाईल...पण ना असते चिंता ना असते भिती असते फक्त तयारी..!

ती तयारी करा.. अभ्यास झालय पुर्ण ही फालतू कारण देऊन आपल्या भविष्याचा, आईबापाच आणी स्वताःचा अपमान तरी करु नका. कारण अभ्यास हा कधीच कुणाचाही पुर्णपणे पुर्ण होत नाही अगदी मरेपर्यंत... मग तुमचा अभ्यास झाला हे कोणीही मान्य करणार नाही. अगदी तुमचे मनही हे वाक्य फेटाळून लावेल. अभ्यास झाला होता राव...! मूड़ ऑफ़ झालाय..! तयारी झाली होती राव..! आता काय काराव ? हा जर विचार करत असाल तर कुठतरी चुकता आहे. पुढचे वेळापत्रक येईपर्यंत रोजचा दिनक्रम तसाच ठेवा... झालच शक्य तर मानसीक तयारी करा. या परिक्षेसोबतच आयुष्यातील कुठल्याही परीक्षेला सामोरी जाण्याची तयारी... खंबीर, संयमी आणी शांत व्हा.. ती सर्वात मोठी ताकद आहे सामर्थ्याची...

 तुमच्यातला ध्येयवेडा माणुस कधीच शांत होऊ देऊ नका. तो शांत झाला तर वाट्याला येणारी प्रश्नावली आयुष्य नैराश्ययुक्त करते. मित्रांनो मला माझे शेकडो मित्र रोजच भेटतात. आणी एक निर्जीव वाक्य वापरतात. " सरकारी नौकरी मिळवण म्हणजे जोक नाही. " मान्य आहे मला हे सगळ. पण हे वाक्य कन्व्हर्ट करता यायला हव. हे वरील वाक्य विनोद आहे फक्त त्यांच्यासाठी जे जिवंतपणी मृत अवस्थेत जगत आहे.. हा विनोद आहे त्यांच्यासाठी जे आयुष्य फक्त मौजमजा करत वाया घालवत आहे मग तुम्ही कोण ? ठरवा... काय करनार हाती आलेल्या वेळेचा सदउपयोग कसा करावा ते.. कारण "प्रत्येक गोष्टीतिल वेळेचे योग्य व अचुक नियोजन तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते..."

शेवटी एकच सांगेल तुकोबारायांच्या शब्दात...

असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे...!

३ टिप्पण्या:

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...