Monday, 18 March 2024

रक्त



👉लाल रक्त पेशी
(आरबीसी किंवा एरथ्रोसाइट्स),

👉पांढर्‍या रक्त पेशी
(ल्युकोसाइट्स) आणि

👉बिंबिका
(प्लेटलेट्स किंवा थ्रोम्बोसाइट्स)

▪️यांनी बनलेला व गुंतागुंतीची (जटिल) रचना असलेला जैविक द्रव पदार्थ आहे.

▪️रक्ताचा मुख्य घटक पाणी आहे.
▪️रक्त हा एकमेव द्रव उती आहे.

▪️रक्तामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण सर्वाधिक असते. या पेशींमधील हिमोग्लोबिन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते.

▪️हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू आणि कार्बन डायॉक्साइड रक्तात विरघळू शकतात आणि त्यांचे वहन करणे सुलभ बनते.

▪️पांढर्‍या रक्त पेशींमुळे संसर्गाला प्रतिबंध होतो तर बिंबिकांमुळे रक्ताची गुठळी होण्यास मदत होते.

🟤 पष्ठ्वंशी प्राण्यांचे रक्त तांबड्या रंगाचे असते.

▪️ सधिपाद प्राणी आणि मृदुकाय प्राण्यांच्या रक्तामध्ये प्राणवायू वहनानासाठी हिमोग्लोबिनऐवजी हिमोसायनिन असते.


मानवी रक्ताचे घटक

मानवी शरीरामध्ये शरीराच्या आठ टक्के वजनाएवढे रक्त असते.

रक्ताची सरासरी घनता १०६० प्रतिकिलो/घन मीटर. ही घनता शुद्ध पाण्याच्या १००० किलो/ घन मीटरच्या जवळपास आहे.

एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे पाच लिटर (१.३ गॅलन) रक्त असते.

रक्तामध्ये रक्तद्रव आणि रक्त पेशी असतात.

🛑 रक्तपेशीमध्ये

👉एरिथ्रोसाइटस- लाल रक्तपेशी;
👉लयूकोसाइट्स- पांढर्‍या रक्त पेशी , आणि
👉थरॉंबोसाइट्स- बिंबिका किंवा रक्तकणिका असतात.

▪️घनफळाच्या दृष्टीने रक्तामध्ये

👉४५% लाल रक्तपेशी आणि
👉५४.३% रक्तद्रव वा
👉०.७% पांढर्‍या रक्त पेशी असतात.

▪️रक्त सांद्रतेचे द्रायुगतिकीच्या दृष्टीने कमीतकमी जागेतून वाहती ठेवण्याच्या दृष्टीने अनुकूलन झाले आहे. सूक्ष्म केशवाहिन्यांमधून पेशी आणि रक्तद्रव सुलभपणे वाहतो.

▪️तांबड्या रक्तपेशीमधील हिमोग्लोबिन जर रक्तद्रव्यामध्ये असते,तर रक्ताच्या वाढलेल्या सांद्रतेमुळे हृदयाभिसरण संस्थेवर ताण पडला असता.


रक्तवाहिन्या 

बंद पद्धतीच्या अभिसरण संस्थेमध्ये तीन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात.

१. धमन्या,
२. केशिका आणि
३. शिरा.


धमन्या

धमन्या (Arteries) शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त वाहून नेतात. यांच्या भिंती जाड असतात. धमन्या शरीरात खोल भागात असतात. त्यांची भित्तिका स्थितिस्थापक असते. सर्व घमन्यांमधून प्राणवायुयुक्त रक्त वाहते. फुप्फुस धमनीत मात्र विनॉक्सिजनित रक्त असते. धमन्यांमधील रक्त दाबयुक्त असते. महाधमनी अनेक स्नायुमय लहान धमन्यांमध्ये विभागलेली असते. स्नायुमय धमनीपासून निघालेल्या लहान धमन्यांना धमनिका म्हणतात.

केशिका

(capillaries) या अत्यंत बारीक एकस्तरीय पातळ भिंती असलेल्या नलिका आहेत. धमनिका आणि शिरिका याना जाळ्याच्या स्वरूपात जोडण्याचे काम करतात. शरीरपेशींशी यांचा प्रत्यक्ष संबंध असतो. केशिकामुळे संप्र्रके, अवशिष्ट पदार्थ, अन्नधटक,कार्बन डाय ऑक्साइड अशा पदार्थांचे उतीबरोबर देवाणघेवाण करण्याचे कार्य होते.

शिरा

शिरांच्या (veins) भिंती पातळ असतात. त्या विविध अवयवाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेतात. अनेक शिरिकांच्या जोडण्यामधून शिरा तयार होतात. शिरिका त्वचेलगत असून कमी स्नायुयुक्त आणि स्थितिस्थापक असतात. फुप्फुस शिरांव्यतिरिक्त सर्व शिरांमधून विनॉक्सिजनित रक्त वाहते. धमन्यांमध्ये रक्त पुढे ढकलण्यासाठी झडपा असतात. शिरांमधून रक्त हृदयाकडे नेण्यात स्नायूंचा मोठा वाटा आहे. स्नायूंच्या हालचालींमुळे शिरांमधील रक्त हृदयाकडे ढकलले जाते.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...