Sunday, 23 August 2020

निओबिअम – जुळ्यांचे दुखणे



🌿१८०२मध्ये एकबर्ग या स्वीडनच्या शास्त्रज्ञास स्कँडेनेव्हियात सापडलेल्या खनिजांमध्ये एक नवीन मूलद्रव्य सापडले.


🌿सतराव्या शतकाच्या मध्यावर कोलंबिया नदीच्या पात्रात काळसर रंगाचे सोनेरी छटा असणारे वजनदार असे एक खनिज मिळाले.

🌿इतर नमुन्यांबरोबर लोहयुक्त खनिज म्हणून ते ब्रिटिश वस्तुसंग्रहालयाकडे पाठवण्यात आले.

 🌿ह खनिज कोलंबाइट म्हणून ओळखले जाऊ लागले. तब्बल १५० वर्षांनंतर १८०१मध्ये चार्ल्स हँचेटचे या खनिजाकडे लक्ष गेले.

🌿याचा अभ्यास करताना लोहाबरोबर यात मँगनिज आणि ऑक्सिजनही सापडले. याशिवाय एक अज्ञात मूलद्रव्यही या खनिजात असल्याचे हँचेटला आढळले.
 या मूलद्रव्याचे नाव हँचेटने कोलंबिअम असे केले.

🌿१८०२मध्ये एकबर्ग या स्वीडनच्या शास्त्रज्ञास स्कँडेनेव्हियात सापडलेल्या खनिजांमध्ये एक नवीन मूलद्रव्य सापडले. ग्रीक पुराणकथेचा आधार घेऊन त्याला टँटॅलम हे नाव देण्यात आले.

🌿 या टँटॅलमचे आणि कोलंबिअमचे बरेच गुणधर्म सारखे होते. बर्झेलिअससह अनेक रसायनशास्त्रज्ञांना वाटले एकाच मूलद्रव्यावर दोन ठिकाणी संशोधन चालू आहे.

🌿काही काळानंतर बर्झेलिअसला आपल्या निष्कर्षांबद्दल शंका आली आणि त्यांनी आपल्या शिष्याला, फ्रेडरिक वोलरला पत्राद्वारे आपली शंका कळविली आणि पुढील संशोधन करण्यास सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...