🔰आतापर्यंत 'गुगल पे'च्या वापरासाठी एकही रुपया आकारला जात नव्हता. आता मात्र अॅक्सिस बँकेसह काही खासगी बँकांनी गुगल पेसाठी दरमहा २० व्यवहार झाल्यानंतर पुढील सर्व व्यवहारांसाठी पैसे आकारायला सुरुवात केली आहे.
🔰आतापर्यंत 'गुगल पे'च्या वापरासाठी एकही रुपया आकारला जात नव्हता. आता मात्र अॅक्सिस बँकेसह काही खासगी बँकांनी गुगल पेसाठी दरमहा २० व्यवहार झाल्यानंतर पुढील सर्व व्यवहारांसाठी पैसे आकारायला सुरुवात केली आहे. तीन रुपयांपासून ते मोठ्या व्यवहारांना १० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येत आहे. यामुळे असंख्य ग्राहकांना आता 'गुगल पे' वापरण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. बँकांनी महिन्याला २० व्यवहारांची मर्यादा ठेवली असून हे व्यवहार चार-पाच दिवसांतच पूर्ण होतात. उरलेले दिवस जे व्यवहार होतील त्यावर अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. गुगल पे आणि बँकांकडून यासंबंधी ग्राहकांना कोणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे. यामुळे आता गुगल पेसारख्याच पण मोफत सेवा देणाऱ्या इतर पर्यायांकडे वळण्याशिवाय पर्याय नाही.
No comments:
Post a Comment