Sunday, 30 August 2020

कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान - अटल बिहारी वाजपेयी



वाजपेयी 3 वेळा भारताचे पंतप्रधान झाले.

ते पहिल्यांदा 1996 मध्ये पंतप्रधान झाले. मात्र, त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही.

यानंतर ते 1998 आणि 1999 मध्ये पंतप्रधान झाले आणि 2004 पर्यंत सत्तेवर होते. आपला कार्यकाळ पूर्ण करणारे वाजपेयी हे पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान ठरले.

📚 जवाहर लाल नेहरू सर्वाधिक काळ राहिले पंतप्रधान -

पंडित जवाहरलाल नेहरू, हे सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. ते तब्बल 16 वर्षे 286 दिवस पंतप्रधान पदावर कार्यरत होते.

तर दुसरा नंबर त्यांची मुलगी इंदिरा गांधी यांचा लागतो. त्या 15 वर्षे 350 दिवस देशाच्या पंतप्रधान होत्या.

📚 गलजारी लाल नंदा यांच्या नावावर सर्वात कमी काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम -

सर्वात कमी काळ भारताच्या पंतप्रधान पदावर राहण्याचा विक्रम गुलजारी लाल नंदा यांच्या नावावर आहे.

लाल बहादुर शास्त्री यांच्या निधनानंतर ते 11 जानेवारी 1966 पासून ते 24 जानेवारी 1966 पर्यंत 13 दिवसांपर्यंत हंगामी पंतप्रधान होते.

यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतरही ते 27 मे 1964 ते 9 जून 1964 पर्यंत हंगामी पंतप्रधान होते.

No comments:

Post a Comment