Sunday, 16 August 2020

जागतिक हिरोशिमा दिवस



💁‍♂ इतिहासातील काळा दिवस :

◾️6 ऑगस्ट 1945 हा मानवाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी, काळा दिवस आहे.

◾️ मित्र राष्ट्रांनी जपानमधील एक संपन्न शहर हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकून सार्‍या जगाला स्तब्ध केले.

◾️या बॉम्बचा प्रभाव एवढा जबरदस्त होता की, तीन लाख वस्तीचे हे शहर क्षणात नष्‍ट झाले. या दुर्दैवी घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
त्यानिमित्ताने या घटनेची ही आठवण..

💣 विध्‍वंसाची झलक दाखविणारा ‘लि‍टल बॉय’ :
जवळजवळ 4 हजार किलोग्रॅम वजनाच्या या बॉमची लांबी 3 मीटर आणि व्यास 71 सेंटीमीटर होता.

◾️ हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब हा युरेनियम गन टाईप अ‍ॅटोमिक बॉम्ब होता.

◾️ तयाचा स्फोट हिरोशिमा शहराच्या 2000 फूट उंचावर झाला. त्यात शहराचा पाच चौ. मैल एवढा भाग नष्ट पावला.

👉 या दोन्ही शहरांत मरण पावलेल्या लोकांतील निम्मे लोक हे बॉम्ब टाकलेल्या दिवशीच मरण पावले.

◾️तयानंतरच्या महिन्यात अनेक जण भाजलेल्या जखमांमुळे, उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे, अन्य जखमा, अपुरा आहार व आजार यामुळे मृत्यू पावले.

📍 जगात अणुवस्त्र चाचण्या सुरूच :

▪️ हिरोशिमा, नागासाकी शहरांवरील हल्ल्यानंतरही जगात 2 हजारांहून अधिक आण्विक शस्त्रांच्या चाचण्या झाल्या.
▪️ 1945 ते 1980 या काळात जगातील 500 हून अधिक ठिकाणी वातावरणातील आण्विक शस्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या.
▪️ चाचणी घेणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान व उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे.

👀 जगभरातील कोणत्या देशांकडे किती अण्वस्त्र :
1⃣ रशिया : 6800 अण्वस्त्र
2⃣ अमेरिका : 6600 अण्वस्त्र
3⃣ फरान्स : 300 अण्वस्त्र
4⃣ *चीन** : 270 अण्वस्त्र
5⃣ बरिटन : 215 अण्वस्त्र
6⃣ पाकिस्तान : 130-140 अण्वस्त्र
7⃣ भारत : 120-130 अण्वस्त्र
8⃣ इस्रायल : 80 अण्वस्त्र
9⃣ उत्तर कोरिया : 10-20 अण्वस्त्र

No comments:

Post a Comment