उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.
थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.
जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.
वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.
पाण्याचे असंगत आचरण=>
सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.
परंतु पाण्याचे तापमान 4℃ पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.
0℃ तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 4℃ तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.
4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 4℃ च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.
पाण्याचे 0℃पासून 4℃ पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.
4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 4℃ ला उच्चतम (Maximum) असते.
पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.
बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 0℃ तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.
थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0℃ पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 4℃होईपर्यंत चालू राहते.
तापमान 4℃ पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते.
No comments:
Post a Comment