Wednesday, 3 January 2024

प्रजनन

अलैंगिक प्रजनन :

वनस्पती -

1. शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)

2. विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल

3. कलिकायन - किन्व यीस्ट

4. बिजाणूजन्य - बुरेशी

5. खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा


लैंगिक प्रजनन:

वनस्पती -

· सपुष्प वनस्पतीमध्ये फुलांचा लैंगिक प्रजननात सहभाग असतो.


प्राणी -

· नर आणि मादीच्या संयोगातून गर्भोशयात युग्मनज तयार होतो आणि वाढीतून नवीन जीव तयार होतो.

· वृक्काचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला 'डायलेसिस (व्याष्लेषण)' म्हणतात.

· बल्बच्या दिव्यात तंगस्टनची तार असते. तंगस्टनची संज्ञा W आहे. वुलफ्रेम (Wolfram) या जर्मन नावावरून ती घेतली आहे.

· आंदोलन काल (T) हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो.

· कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी एकू शकतात.

· परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तीत दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.

· जे सजीव स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. तर ज्यांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी म्हणतात.

· विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रसायनिक पदार्थांचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मिकरन म्हणतात.

· हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायोक्साइड, प्रकाश, हरितद्रव, पाणी या घटकाची गरज असते.

· आयोडीन द्रावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...