Tuesday, 11 August 2020

ओझोन चे संरक्षण कवच

🔰 वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो.

🔰ओझोन  वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे  सजीवांसाठी फार महत्त्वाचे आहे.

🔰सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ही
किरणे ओझोन वायू शोषून घेतो. त्यामुळे पृथ्वीवरील  सजीवांचे रक्षण होते.

🔰वातानुकूलन यंत्रे, रेफ्रिजरेटर्स यांमध्ये हवा थंड  करण्यासाठी वापरला जाणारे
📌 क्लोरोफ्लुरोकार्बन्स तसेच 
📌 कार्बन टेट्राक्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास  ओझोनच्या थराचा नाश होतो. 

🔰ओझोनचे महत्त्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी  १६ सप्टेंबर हा दिवस जगभर ‘ओझोन संरक्षण दिन’  म्हणून मानला जातो.

1 comment:

  1. ओझोन चे संरक्षण करण्यासाठी जग्लांचे संरक्षण करणे गरजेचे आहे आणि त्यातील जीवांचे पण जतन करणे गरजेचे आहे थोडक्यात https://ranjkmarathi.blogspot.com/2022/05/platypus.html

    ReplyDelete