Sunday, 16 August 2020

मिझोरममध्ये जागतिक दर्जाच्या “तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” प्रकल्पाचे उद्‌घाटन



🔸4 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते मिझोरममधील “तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” प्रकल्पाचे आभासी पद्धतीने उद्‌घाटन करण्यात आले. हा प्रकल्प भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेच्या अंतर्गत तयार केला जात आहे.

🔸सवदेश दर्शन-ईशान्य सर्कीट अंतर्गत, नवीन पर्यावरणपूरक पर्यटनाच्या एकात्मिक विकासासाठी स्वदेशी दर्शन-ईशान्य विभागातल्या मिझोरमच्या तेंझाल आणि साऊथ झोटेच्या सेर्शिप व रीक जिल्ह्यात 92.25 कोटी रुपये किमतीचा हा प्रकल्प मंजूर करण्यात आला. त्यापैकी 64.48 कोटी रुपये तेंझाल येथील गोल्फ कोर्ससह विविध घटकांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

प्रकल्पाचे वैशिष्ट्ये

🔸तझाल येथील गोल्फ कोर्सची रचना कॅनडामधील अव्वल क्रमांकाची गोल्फ कोर्स वास्तुविशारद कंपनी म्हणून ओळख असलेल्या ग्रॅहॅम कूक अँड असोसिएट्स यांनी केली आहे.

🔸एकूण क्षेत्रफळ 105 एकर असून 18 होल सह गोल्फचे मैदान 75 एकर क्षेत्रफळावर आहे.

🔸अमेरिकेतील रेन बर्ड यांची स्वयंचलित स्प्रिंकलर सिंचन प्रणाली आहे.

🔸आतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी याची रचना केली गेली आहे. तेथे जागतिक दर्जाचे सायबेरियन पाईन लाकूड वापरून 30 पर्यावरणपूरक बांबूच्या झोपड्या, उपहारगृह खुल्या हवेतले फूड कोर्ट, स्वागतकक्ष आणि प्रतीक्षागृह इत्यादी सुविधा आहेत.

पार्श्वभूमी

🔸बहुतेक देशांच्या तुलनेत भारतात हवामानविषयक परिस्थिती अधिक अनुकूल असल्याने भारतात गोल्फ पर्यटनाची प्रबल क्षमता आहे. देशातील नयनरम्य निसर्गस्थळे आणि एकमेवाद्वितीय अशी आतिथ्य सेवा देखील भारतातील गोल्फ पर्यटन क्षेत्रात पूरक ठरत आहे. आज भारतामध्ये एकूण 230 हून अधिक गोल्फ कोर्स आहेत. भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय देशातील गोल्फ पर्यटनाच्या विकासासाठी उत्प्रेरक आणि सक्रीय समर्थक म्हणून काम करण्याचे प्रयत्न करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक गोल्फ कोर्स भारतामध्ये आहेत आणि भारतात आयोजित केलेल्या गोल्फ स्पर्धाही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करतात. गोल्फ पर्यटनातील वाढती रुची ओळखून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उत्पादन म्हणून गोल्फ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालय एक व्यापक आणि समन्वित आराखडा तयार करीत आहे.

स्वदेश दर्शन योजनेविषयी

🔸भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘प्रसाद’ (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive -PRASAD) आणि ‘स्वदेश दर्शन योजना’ सन 2014-15 मध्ये सुरू केली. देशात विषय आधारित पर्यटन सर्किट (circuit) प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरू केली गेली आहे.

🔸या योजनेच्या अंतर्गत विकासासाठी आतापर्यंत 15 पर्यटन परिक्रमांची (circuit) ओळख पटविण्यात आलेली आहे. ते आहेत - बुद्धीष्ट सर्किट, ईशान्य सर्किट, तीर्थंकार सर्किट, सागरकिनारा सर्किट, हिमालय सर्किट, कृष्ण सर्किट, वाळवंट सर्किट, पर्यावरण सर्किट, वन्यजीवन सर्किट, आदिवासी सर्किट, ग्रामीण सर्किट, सूफी सर्किट, आध्यात्मिक सर्किट, रामायण सर्किट आणि वारसा सर्किट.

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...