Saturday 8 August 2020

आजच्याच दिवशी कलकत्त्यातील टाऊन हॉल येथून स्वदेशी आंदोलनाची औपचारिक सुरुवात झाली होती...

🔸7 जुलै 1905 रोजी सिमला येथून लॉर्ड कर्झन याने बंगालच्या फाळणीची योजना घोषित केली.

🔸19 जुलै- सरकारने अधिकृतरीत्या बंगालच्या फाळणीचा निर्णय घेतला.

🔸20 जुलै-बंगालचे विभाजन दोन भागात करण्यात आले.

🔸7 ऑगस्ट-फाळणी अंमलात येण्याच्या आधीच देशभरात वंगभंग व स्वदेशी चळवळ सुरू.

🔸16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालची फाळणी अंमलात आली व बंगालमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली.

🔸बंगाल प्रांताच्या विभाजनाची जबाबदारी ही पूर्णत: कर्झनची असली तरी मूळ कल्पना मात्र त्याची नव्हती.

👉सदरील फाळणीची योजना ही विल्यम वार्ड कल्पनेनुसार बंगालचा लेफ्टनंट गव्हर्नर सर अँड्रयू फ्रेजर (फाळणीच्या योजनेचा जनक) याने आखली होती...

🔸फाळणीचे कारण काय दर्शविले- प्रशासकीय सीमांचे पुननिर्धारण...

🔸 फाळणीमुळे बंगालचे परिवर्तन दुसऱ्या आयर्लंडमध्ये होईल असा इशारा निसंदिग्ध शब्दात कृष्णकुमार मित्रा यांनी 'संजीवनी' मधून दिला.

🔸ही स्वदेशी चळवळ प्रामुख्याने बंगालच्या फाळणीला विरोध दर्शवण्यासाठी सुरू करण्यात आली.

🔸जमीनदार,शेतकरी,कामगार,स्त्रिया,विद्यार्थी हा वर्ग या चळवळीत सहभागी झाला परंतु या चळवळीची उणीव म्हणजे यात मुस्लिम गटाचा विशेष करून मुस्लिम शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळवता आला नाही.

वंगभंग आंदोलन-
🔸16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा दिवस बंगाली जनतेने 'राष्ट्रीय शोक दिन' म्हणून पाळला.स्वदेशीचा पुरस्कार करून परकीय मालावर बहिष्कार टाकण्यास सुरूवात झाली.

🔸बंकिमचंद्र यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीतील 'वंदे मातरम' हे गीत आंदोलकांच्या परवलीचा शब्द बनले. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा वर बहिष्कार टाकला.

🔸डॉ.प्रफुल्लचंद्र रे यांनी 'बंगाल केमिकल्स' हा औषधांचा स्वदेशी कारखाना काढला.

🔸या स्वदेशी चळवळीचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी,कृष्णकुमार मित्रा (संजीवनी वृत्तपत्राचे संपादक),आनंद मोहन बोस,गुरुदास बॅनर्जी,रवींद्रनाथ टागोर यांनी केले.

🔸महाराष्ट्र व पंजाब मधील जनतेनेही या चळवळीत साथ दिली.
🔸1905 च्या बनारस अधिवेशनात (अध्यक्ष-गोखले) बंगालच्या फाळणीचा तीव्र निषेध.

🔸1906 च्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट असल्याचे सांगत स्वराज,स्वदेशी,बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण यास मंजुरी दिली.
अध्यक्षीय भाषणात दादाभाईंनी 'चळवळ करा,चळवळ करा,अखंड चळवळ करा' असा संदेश दिला.

👉बंगालची फाळणी रद्द करण्या संबंधीचा ठराव ढाक्याचा नवाब ख्वाजा आतिकुल्ला यांच्याकडून मांडला गेला.

🔸लोकमान्य टिळकांनी राजकीय चळवळीसाठी स्वराज्य,स्वदेशी,बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा चतु:सुञी कार्यक्रम भारतीयांना दिला.

🔸पुढे वंगभंग विरोधी आंदोलन राष्ट्रव्यापी बनल्याने 12 डिसेंबर 1911 (लक्षात ठेवायला सोप्प 😊 12-12-11) रोजी लॉर्ड हार्डिंग्जने भरवलेल्या दिल्ली दरबारात ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा केली.

No comments:

Post a Comment