◾️ सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असतांना खोदकाम करतेवेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपीत मुद्रा सापडल्या.
◾️ सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली तीच सिंधु संस्कृती होय.
◾️ ही संस्कृती इसवी सन पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते.
◾️ आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खनामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालीबंगन, सुरूकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे.
◾️ आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागर हडप्पा व मोहेंजदडो या नावानी प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधु आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती.
No comments:
Post a Comment