Saturday 15 August 2020

चालू घडामोडी चे प्रश्न व उत्तरे





Q1) कोणत्या देशाने मंगळ ग्रहाकडे ‘परझेव्हेरन्स’ नामक रोव्हर पाठवले?
उत्तर :- संयुक्त राज्ये अमेरिका

Q2) कोणत्या संस्थेनी ‘AIM-iCREST’ उपक्रम चालविण्याकरीता अटल इनोव्हेशन मिशनसोबत करार केला?
उत्तर :- बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन

Q3) निधन पावलेले पद्मश्री प्राप्त सोनम त्शेरिंग लेप हे कोणत्या क्षेत्रातले एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते?
उत्तर :- लोक संगीत

Q4) कोणती संस्थेनी कोविड-19 रुग्णांची राष्ट्रीय वैद्यकीय नोंदणी सूची तयार करण्यासाठी अखिल भारतीय वैद्यकीयशास्त्र संस्थेसोबत (AIIMS) भागीदारी केली?
उत्तर :- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

Q5) कोणत्या संस्थेत नवजात बाळामध्ये बिलीरुबिनची पातळी तपासण्यासाठी AJIO-Neo नामक एक वेदनारहीत उपकरण विकसित केले?
उत्तर :-  एस.एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस

Q6) कोणत्या संस्थेसोबत भारत सरकार ग्वाल्हेर-चंबळ पट्ट्यातल्या क्षेत्राला शेतीयोग्य करण्यासाठी आर्थिक करार करणार आहे?
उत्तर :- जागतिक बँक

Q7) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय मूल्यांकन केंद्राचे नाव काय आहे?
उत्तर :-  परख

Q8) कोणत्या कंपनीसोबत कवच या उपक्रमाने “लिफास कोविड स्कोअर” नामक कोविड जोखीम व्यवस्थापन प्रोफाइल विकसित करण्यासाठी करार केला?
उत्तर :- अकुली लॅब

Q9) कोणत्या देशाने व्हिएतनामसोबत मत्स्यव्यवसायाचे व्यवस्थापन आणि कायद्याची अंमलबजावणी क्षमता बळकट करण्यासाठी एक सामंजस्य करार केला?
उत्तर :- संयुक्त राज्ये अमेरिका

Q10) कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्याच्या विकासासाठी भारतीय क्रिडा प्राधिकरणाने ‘विशेष पुनर्रूपांतर अभ्यासक्रम’ नामक कार्यक्रम आयोजित केला?
उत्तर :- फुटबॉल


Q1) कोणत्या देशात जगातली सर्वात मोठी प्रयोगात्मक अणुभट्टी तयार केली जात आहे?
उत्तर :- फ्रान्स

Q2) मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवीन नाव काय आहे?
उत्तर :-  शिक्षण मंत्रालय

Q3) कोणत्या व्यक्तीला पेटीएम मनी या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले आहे?
उत्तर :- वरुण श्रीधर

Q4) कोणत्या सार्वजनिक संस्थेनी स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि उद्योजकता विकास यासाठी IIT कानपूर या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?
उत्तर :- पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन

Q5) कोणत्या देशाने पारंपरिक औषधी आणि होमिओपथी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासाठी भारतासोबत सामंजस्य करार केला?
उत्तर :- झिम्बाब्वे

Q6) कोणत्या देशाने अॅंटीमायक्रोबियल रेझिस्टन्स विषयक संशोधनासाठी भारतासोबत करार केला?
उत्तर :- ब्रिटन

Q7) कोणाला भूशास्त्र मंत्रालयाकडून ‘जीवनगौरव उत्कृष्ठता पुरस्कार 2020’ने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :-  अशोक साहनी

Q8) कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात पवन हंस या कंपनीने उडान योजनेच्या अंतर्गत प्रथम हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ केला?
उत्तर:-  उत्तराखंड

Q9) भारतीय हवाई दलाच्या कोणत्या पथकाला ‘गोल्डन अॅरोज’ म्हणून संबोधले जाते?
उत्तर :-  स्क्वॉड्रॉन 17

Q10) _ संस्थेनी “अस्पायर” नावाने एक ई-संकेतस्थळ कार्यरत केले.
उत्तर :-  इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी


Q1) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने अरावलीच्या भागात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी एरियल सीडिंग हे तंत्र वापरले?
उत्तर :-  हरियाणा

Q2) ब्रिटनने भारताला परत केलेली ‘नटेशा’ची प्रतिमा कोणत्या राज्यातल्या मंदिरामधली आहे?
उत्तर :-  राजस्थान

Q3) कोणते मंत्रालय पंचायत निधीच्या संबंधित ऑनलाईन लेखापरीक्षण करणार आहे?
उत्तर :- पंचायतराज मंत्रालय

Q4) कोणत्या संस्थेसोबत भारत सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी जैवतंत्रज्ञान विकसित करण्यासंबंधी करार करणार आहे?
उत्तर :- युरोपीय संघ

Q5) कोणत्या व्यक्तीची ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर नेमणूक करण्यात आली?
उत्तर :-  एस. एन. राजेश्वरी

Q6) कोणत्या आंतरराष्ट्रीय बँकेनी भारतासाठी कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी 3 दशलक्ष डॉलरचे कर्ज मंजूर केले?
उत्तर :- आशियाई विकास बँक

Q8) कोणत्या संस्थेनी ‘अॅस्ट्रोनोमी जिनियालॉजी’ प्रकल्पाचा प्रारंभ केला?
उत्तर :- अमेरिकन अॅस्ट्रोनोमिकल सोसायटी

Q9) कोणत्या राज्यात कृषी क्षेत्रातल्या उत्सर्जनात घट करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ‘ग्रीन-अ‍ॅग्री’ प्रकल्प चालू करण्यात आला आहे?
उत्तर :- मिझोरम

Q10) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने रस्ते दुरुस्तीसाठी ‘मॅकॅडमीशन’ कार्यक्रम चालवला?
उत्तर :- जम्मू व काश्मीर


Q1) कोणत्या व्यक्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर :- हार्दिक सतीशचंद्र शाह

Q2) कोणत्या व्यक्तीची ICRA लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक या पदावर नेमणूक झाली?
उत्तर :- एन. शिवरामन

Q3) कोणत्या राज्यातला जिल्हा नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्ह्यांच्या मानांकन यादीत अव्वल ठरला?
उत्तर :- छत्तीसगड

Q4) कोणत्या शहरात गटार स्वच्छ करण्यासाठी ‘बॅन्डिकूट’ नामक रोबोट कार्यरत करण्यात आला?
उत्तर :- गुवाहाटी

Q5) प्रथम मुस्लिम महिला हक्क दिन कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- 1 ऑगस्ट 2020

Q6) कोणत्या व्यक्तीची गुजरात राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर नेमणूक झाली?
उत्तर :- आशिष भाटिया

Q7) कुठल्या विमा कंपनीने ‘बोहोत जरुरी है’ मोहीमेचा प्रारंभ केला?
उत्तर :- भारती एक्सा लाइफ इन्शुरन्स कंपनी

Q8) कोणत्या व्यक्तीचा ग्लोबल फेलोशिप अ‍ॅवॉर्ड याचा ‘कर्मवीर चक्र पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला?
उत्तर :- सुनील एस. एस.

Q9) 2020 साली “व्यक्तींमधली तस्करीच्या विरोधात जागतिक दिन”ची संकल्पना काय आहे?
उत्तर :-  कमिटेड टु द कॉज – वर्किंग ऑन द फ्रंटलाइन टु एंड ह्यूमन ट्रॅफिकिंग

Q10) ‘गुस्ताव ट्रॉव्ह पुरस्कार’ जिंकणार्‍या भारतातल्या प्रथम सौर नौकेचे नाव काय आहे?
उत्तर :- आदित्य

Q1) कोणत्या मंत्रालयाला स्कोच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :- आदिवासी कल्याण मंत्रालय

Q2) कोणत्या संस्थेसोबत SIDBI संस्थेनी ‘MSME सक्षम’ नामक मंच तयार करण्यासाठी भागीदारी केली?
उत्तर :-  ट्रान्सयूनीयन सिबिल

Q3)कोणत्या व्यक्तीची आयव्हरी कोस्ट देशाच्या पंतप्रधान पदावर निवड झाली?
उत्तर :-  हमेद बाकायोकों

Q4) कोणत्या मंत्रालयाने “विद्यार्थी विज्ञान मंथन, 2020-21” नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

Q5) कोणते राज्य तीन राजधान्या असणारे देशातले पहिलेच राज्य ठरले?
उत्तर :- आंध्रप्रदेश

Q6) 'फॉर्म्युला वन ब्रिटीश ग्रँड प्रिक्स 2020’ ही शर्यत कोणी जिंकली?
उत्तर :-  लेविस हॅमिल्टन

Q7) कोणत्या देशात अरब जगतातली पहिली अणुभट्टी आहे?
उत्तर :- संयुक्त अरब अमिरात

Q8) कोणत्या व्यक्तीने “2020 बीएल आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महोत्सव’ या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला?
उत्तर :- हरिकृष्ण पेंटाला

Q9) 1 ऑगस्ट 2020 रोजी कोणती कंपनी जगातील सर्वात मौल्यवान सार्वजनिकपणे सूचीबद्ध कंपनी बनली आहे?
उत्तर :- अॅपल

Q10) कोणत्या संस्थेच्या वतीने “वॉटर हीरोज अवॉर्ड” हा पुरस्कार दिला जातो?
उत्तर :- जलशक्ती मंत्रालय


Q1) कोणत्या व्यक्तीने गुयाना देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली?
उत्तर :- डॉ इरफान अली

Q2) कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी 'ई-रक्षा बंधन' कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- आंध्रप्रदेश

Q3) कोणत्या राज्य सरकारने “एक मास्क-अनेक जिंदगी” मोहीम राबविण्यास सुरुवात केली?
उत्तर :-  मध्यप्रदेश

Q4) कोणत्या संकल्पनेखाली 2020 सालाचा ‘जागतिक स्तनपान आठवडा’ आयोजित करण्यात आला?
उत्तर :- सपोर्ट ब्रेस्टफीडिंग फॉर ए हेल्दीयर प्लॅनेट

Q5) “सियासत में सदस्यता” हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर :- विजय कुमार चौधरी

Q6) कोणत्या संस्थेत मोतीबिंदूवरील उपचारासाठी अ‍ॅस्पिरिन औषधापासून नॅनोरोड विकसित करण्यात आले?
उत्तर :- इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी

Q7) कोणत्या संस्थेला पर्यावरण शाश्वतीकरण श्रेणीत ‘FICCI CSR पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले?
उत्तर :- दालमिया भारत ग्रुप

Q8) कोणती व्यक्ती जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाच्या बैठक सत्राचे अध्यक्ष होते?
उत्तर :- डॉ. हर्ष वर्धन

Q9) कोणत्या राज्यात फिरते ‘iMASQ कोविड-19 तपासणी केंद्र’चे अनावरण करण्यात आले?
उत्तर :- तेलंगणा

Q10) कोणता देश आशिया-प्रशांत क्षेत्रासाठीच्या कार्यकारी मंडळात ‘संयुक्त राष्ट्रसंघ-निवासक्षेत्र’ यांच्यावतीने सदस्य म्हणून निवडला गेला?
उत्तर :- इराण


Q1) जगातला सर्वात उंच रेल्वे पूल कुठे बांधण्यात येत आहे?
उत्तर :-  जम्मू व काश्मीर

Q2) कोणत्या संस्थेत “विमेन आंत्रेप्रेनेऊरशिप अँड एंपोवरमेंट (WEE) कोहोर्ट” उपक्रमाचा प्रारंभ केला गेला?
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

Q3)कोणत्या बँकेनी ‘कोना कोना उम्मीद’ मोहीमेचा प्रारंभ केला?
उत्तर :- कोटक महिंद्रा बँक

Q4) "स्वच्छ भारत रेव्होल्यूशन” या पुस्तकाचे संपादक कोण आहेत?
उत्तर :- परमेश्वरन अय्यर

Q5) कोणत्या संस्थेच्यावतीने “सहकार कूपट्यूब NCDC चॅनेल” कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ

Q6 'खेलो इंडिया’योजनेच्या सर्वसाधारण परिषदेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर :- किरेन रीजीजू

Q7) कोणत्या व्यक्तीची ऑल इंडिया रेडिओच्या वार्ता सेवा विभागाच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :- जयदीप भटनागर

Q8) कोणत्या राज्याने महिला सक्षमीकरणासाठी ITC, HUL आणि P&G या संस्थांसोबत सामंजस्य करार केला?
उत्तर :- आंध्रप्रदेश

Q9) कोणत्या संस्थेला ‘गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अवॉर्ड 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर

Q10) कोणत्या व्यक्तीची HDFC बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- शशिधर जगदीशन ( अगोदरचे आदित्य पुरी )


Q1) कोणता देश महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त स्मारक नाणी जाहीर करणार?
उत्तर :- ब्रिटन

Q2) कोणत्या सार्वजनिक संस्थेनी लोक तक्रारींचे विश्लेषण करण्यासाठी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला?
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर

Q3) निधन झालेले जॉन ह्यूम यांनी कोणत्या क्षेत्रात नोबेल पारितोषिक जिंकले होते?
उत्तर :- शांती

Q4) ‘हुरुन ग्लोबल युनिकॉर्न लिस्ट 2020’ यामध्ये भारताचा कोणता क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q5) भारतीय रोखे व विनिमय मंडळाच्या (SEBI) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर :- अजय त्यागी

Q6) कोणत्या व्यक्तीची जम्मू व काश्मीरचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :-  मनोज सिन्हा

Q7) कोणाला गुयाना देशाच्या पंतप्रधान पदावर नेमण्यात आले आहे?
उत्तर :- मार्क अँथनी फिलिप्स

Q8) कोणत्या बँकेनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आवाजी पद्धतीने चालणारा ‘AXAA’ नामक सहाय्यक सादर केला?
उत्तर :- अ‍ॅक्सिस बँक

Q9) कोणत्या संस्थेनी “ईरॅडिकेटिंग मॉडर्न स्लेव्हरी: अॅन अॅसेसमेंट ऑफ कॉमनवेल्थ गव्हर्नमेंट प्रोग्रेस” या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर :- कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स इनिशिएटिव्ह


Q1) कोणती कंपनी बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेमध्ये एका रोबोटिक्स प्रयोगशाळेची स्थापना करणार आहे?
उत्तर :- नोकिया

Q2) कोणत्या राज्यात “तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” आहे?
उत्तर :- मिझोरम

Q3) ‘विशेष: कोड टू विन’ हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे चरित्र आहे?
उत्तर:-  विशाल भृगुवंशी

Q4) कोणत्या व्यक्तीला भारतीय रसायन संशोधन मंडळातर्फे ‘कास्य पदक 2021’ हा सन्मान देण्यात आला?
उत्तर :- श्रीहरी पब्बराजा

Q5)कोणत्या व्यक्तीची संयुक्त राष्ट्रसंघ प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे जागतिक कार्यक्रम समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :- प्रवीण परदेशी

Q6) कोणत्या संस्थेनी ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2020’ स्पर्धा जिंकली?
उत्तर :- डिफेन्स इन्सिट्यूट ऑफ अँडव्हान्स टेक्नॉलॉजी

Q7) कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान पहिली ‘किसान रेल’ धावली?
उत्तर :- देवळाली (महाराष्ट्र) आणि दानापूर (बिहार)

Q8) कोणत्या व्यक्तीची भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :-  गिरीश चंद्र मुर्मू

Q9) भारताने MIFCOला वित्तपूरवठा करण्यासाठी 18 दशलक्ष डॉलरपर्यंत पतमर्यादा वाढविली आहे. MIFCO ही कोणत्या देशाची संस्था आहे?
उत्तर :- मालदीव

Q10) कोणत्या संस्थेनी महामार्गांच्या व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यासाठी एक उत्कृष्टता केंद्र उभारण्याकरीता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) सोबत एक सामंजस्य करार केला?
उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

Q1) कोणत्या राज्य सरकारने आभासी वर्ग भरविण्यासाठी गुगल कंपनीसोबत करार केला?
उत्तर :- महाराष्ट्र

Q2) कोणता देश 2021 साली पुरुषांच्या ‘ICC टी-20 विश्वचषक’ स्पर्धेचे आयोजन करणार?
उत्तर :- भारत

Q3) कोणत्या व्यक्तीची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महानिरीक्षक पदावर नेमणूक झाली?
उत्तर :-  पी. एस. रानीपसे

Q4) कोणत्या व्यक्तीची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदावर नेमणूक झाली?
उत्तर :- प्रदीप कुमार जोशी

Q5) रेलगाड्यांवर वास्तविक वेळेत देखरेख ठेवण्यासाठी तयार केलेल्या भारतीय रेल्वेच्या मोबाइल अ‍ॅपचे नाव काय आहे?
उत्तर :- OHE इन्सपेक्शन अॅप

Q6) कोविड-19 महामारीमुळे संकटात सापडलेल्या मालमत्तेच्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेनी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- के. व्ही. कामथ

Q7) कोणत्या पेमेंट्स बँकेनी “स्मार्ट प्लान शॉप पॅकेज” विमा योजनेसाठी भारती एक्सा जनरल इन्शुरन्स या कंपनीसोबत करार केला?
उत्तर :-  एअरटेल पेमेंट्स बँक

Q8) कोणत्या राज्य सरकारने “शहीद महेंद्र कर्मा तेंदूपत्ता संग्रहक सामाजिक सुरक्षा योजना” या नावाने एका सामाजिक सुरक्षा योजनेचा प्रारंभ केला?
उत्तर :- छत्तीसगड

Q9) निधन झालेले शिर्ले अ‍ॅन ग्राउ हे कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?
उत्तर :-  साहित्य

Q10) कोणत्या संस्थेनी "द ग्रेट मेस्ट्रो अबानिंद्रनाथ टागोर" या शीर्षकाची आभासी प्रदर्शनी आयोजित केली?
उत्तर :- राष्ट्रीय आधुनिक कला दालन

Q1) कोणत्या व्यक्तीची PNB हाउसिंग फायनान्स लिमिटेड या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाली?
उत्तर :- हरदयाल प्रसाद

Q2) कोणत्या देशाने बहुपक्षीय ‘कावकाझ 2020’ नावाचा लष्करी सराव आयोजित केला?
उत्तर :- रशिया

Q3) कोणत्या संस्थेनी ‘”स्पॉटेड” इन इललीगल वाइल्डलाइफ ट्रेड: ए पीक इंटू ऑनगोइंग पोचिंग अँड इललीगल ट्रेड ऑफ लेपर्ड इन इंडिया’ या शीर्षकाचा अहवाल प्रकाशित केला?
उत्तर :-  ट्रॅफिक

Q4) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने ‘विजेरी वाहन धोरण’ तयार केले?
उत्तर :- दिल्ली

Q5) कोणत्या भारतीय संस्थेची ‘फूड व्हिजन 2050 प्राइज’ या पुरस्कारासाठी निवड झाली?
उत्तर :- नांदी फाउंडेशन

Q6) 'रॉ: ए हिस्ट्री ऑफ इंडियाज कोव्हर्ट ऑपरेशन्स' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर :- यतीश यादव

Q7) ‘अमेझिंग अयोध्या’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर :-  नीना राय

Q8) कोणत्या राज्यात ‘राष्ट्रीय स्वच्छता केंद्र’चे उद्घाटन झाले?
उत्तर :-  नवी दिल्ली

Q9) 2020 या वर्षाच्या ‘जगभरातल्या मूळनिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिन’ची संकल्पना काय आहे?
उत्तर :-  कोविड-19 अँड इंडिजिनस अँड पीपल्स रेझिलन्स

Q10) अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या कोणत्या अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाला सुरूवात झाली होती?
उत्तर :-  मुंबई

Q1) कोणत्या भारतीय संस्थेनी निम्न व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांसाठी कोविड-19 लसीच्या उत्पादनाला गती देण्यासाठी गावी संस्थेसोबत भागीदारी करार केला?
उत्तर :-  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

Q2) कोणत्या कंपनीने ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ योजनेसाठी उत्तरप्रदेश सरकारसोबत सामंजस्य करार केला?
उत्तर :- फ्लिपकार्ट

Q3) कोणत्या व्यक्तीला ‘ACJ अन्वेषण पत्रकारिता पुरस्कार’ मिळाला?
उत्तर :- नितीन सेठी

Q4) कोणत्या संस्थेचा अन्न व पोषण क्षेत्रामध्ये सहयोगात्मक संशोधन आणि माहिती प्रसारणासाठी FSSAI सोबत सामंजस्य करार झाला?
उत्तर :- वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद

Q5) कोणत्या अंतराळ संस्थेनी ‘स्टारलिंक’ उपग्रहांचा एक संच अंतराळात पाठवला?
उत्तर  :- स्पेसएक्स

Q6) कोणत्या व्यक्तीची श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी निवड झाली?
उत्तर :- महिंदा राजपक्षे

Q7) कोणत्या राज्यात KVIC कडून रेशीमसाठी पहिलेच असे प्रशिक्षण व उत्पादन केंद्र उभारण्यात आले?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश

Q8) कोणत्या विषयाखाली 2020 साली ‘जागतिक जैवइंधन दिन’ पाळण्यात आला? ( 10 ऑगस्ट )
(A) बायोफ्युल्स टुवर्ड्स आत्मनिर्भर भारत

Q9) किती निधीसह “कृषी पायाभूत सुविधा कोष” ही नवी केंद्रीय क्षेत्र योजना तयार करण्यात आली?
उत्तर :- 1 लक्ष कोटी रुपये

Q10) कोणत्या राज्यातल्या गावांना UNESCO तर्फे “सुनामी रेडी” म्हणून घोषित करण्यात आले आहे?
उत्तर :- ओडिशा


Q1) पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला CANI प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर :-  सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल

Q2) कोणत्या राज्याने ‘इंदिरा वन मितान योजना’ लागू केली?
उत्तर :- छत्तीसगड

Q3) कोणत्या संस्थेनी वायू गुणवत्तेच्या संदर्भात व्यवस्थापनासाठी GIS-आधारित व्यासपीठ तयार करण्यासाठी बिहार राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत करार केला?
उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

Q4) नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन (NIP) याच्या संदर्भातले इंडिया इन्वेस्टमेंट ग्रीड (IIG) व्यवस्था कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते?
उत्तर :-  वाणिज्य व उद्योग मंत्रालय

Q5 'सुरक्षा’ या नावाचे राष्ट्रीय संकेतस्थळ मानवाचा कोणत्या प्राण्याशी संघर्ष टाळण्याच्या संदर्भात आहे?
उत्तर :- हत्ती

Q6) भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान IC-IMPACTS वार्षिक संशोधन परिषद आयोजित केली जाते?
उत्तर :- कॅनडा

Q7) कोणत्या विमानतळाने भारताशी जुळलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी ‘एयर सुविधा’ या नावाने एक संकेतस्थळ विकसित केले?
उत्तर :- दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ

Q8) निधन झालेले मनीतोम्बी सिंग कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते?
उत्तर :- फुटबॉल

Q9) कोणत्या व्यक्तीची मुंबईत प्राप्तिकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त पदावर नेमणूक झाली?
उत्तर :- पतंजली झा

Q10) कोणत्या व्यक्तीची RoDTEP योजनेच्या अंतर्गत कमाल मर्यादा निश्चित करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?
उत्तर :-  जी. के. पिल्लई

● ‘स्मार्ट इंडिया हॅकाथॉन 2020’ स्पर्धा कोणत्या संस्थेनी जिंकली?

*उत्तर*  : डिफेन्स इन्सिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी

● बंगळुरूच्या भारतीय विज्ञान संस्थेमध्ये एका रोबोटिक्स प्रयोगशाळेची स्थापना कोणती कंपनी करणार आहे?

*उत्तर*  : नोकिया

● “तेंझाल गोल्फ रिसॉर्ट” कोणत्या राज्यात आहे?

*उत्तर*  : मिझोरम (जिल्हा, एझवाल)

● बास्केटबॉल संघाचा कर्णधार विशाल भृगुवंशीच्या चरित्रावर आधारित ‘विशेष: कोड टू विन’ या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत?

*उत्तर* : निरुपमा यादव

● भारतीय रसायन संशोधन मंडळातर्फे ‘कास्य पदक 2021’ हा सन्मान कोणाला देण्यात आला?

*उत्तर* : श्रीहरी पब्बराजा

● संयुक्त राष्ट्रसंघ प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे जागतिक कार्यक्रम समन्वयक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

*उत्तर*  : प्रवीण परदेशी

● पहिली ‘किसान रेल’ कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान धावली?

*उत्तर*  : देवळाली (महाराष्ट्र) आणि दानापूर (बिहार)

● भारताच्या नियंत्रक व महालेखापरीक्षक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली?

*उत्तर*  : गिरीश चंद्र मुर्म

● श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली?

*उत्तर* : महिंदा राजपक्षे

● ‘ACJ अन्वेषण पत्रकारिता पुरस्कार’ कोणाला मिळाला?

*उत्तर* : नितीन सेठी (‘द हफिंग्टन पोस्ट इंडिया’ वृत्तसंस्था, पत्रकार)

● अन्न व पोषण क्षेत्रामध्ये सहयोगात्मक संशोधन आणि माहिती प्रसारणासाठी FSSAI सोबत कोणत्या संस्थेचा सामंजस्य करार झाला?

*उत्तर* :  वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

● ‘स्टारलिंक’ उपग्रहांचा एक संच अंतराळात कोणत्या अंतराळ संस्थेनी पाठवला?

*उत्तर* : स्पेसएक्स

● ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ योजनेसाठी उत्तरप्रदेश सरकारसोबत कोणत्या कंपनीने सामंजस्य करार केला?

*उत्तर* : फ्लिपकार्ट

● “कृषी पायाभूत सुविधा कोष” ही नवी केंद्रीय क्षेत्र योजना किती निधीसह तयार करण्यात आली?

*उत्तर* : 1 लक्ष कोटी रुपये

● यंदा 2020 साली कोणत्या विषयाखाली ‘जागतिक जैवइंधन दिन’ पाळण्यात आला?

*उत्तर* : बायोफ्युल्स टुवर्ड्स आत्मनिर्भर भारत

● KVIC कडून रेशीमसाठी पहिलेच प्रशिक्षण व उत्पादन केंद्र  कोणत्या राज्यात उभारण्यात आले?

*उत्तर* : अरुणाचल प्रदेश

● आयव्हरी कोस्ट देशाच्या पंतप्रधान पदावर कोणाची निवड झाली?

*उत्तर* : हमेद बाकायोको

● स्कोच पुरस्काराने कोणत्या मंत्रालयाला सन्मानित करण्यात आले?

उत्तर* : आदिवासी कल्याण मंत्रालय

● SIDBI संस्थेनी ‘MSME सक्षम’ नामक मंच तयार करण्यासाठी कोणत्या संस्थेसोबत भागीदारी केली?

*उत्तर* : ट्रान्सयूनीयन सिबिल

● “विद्यार्थी विज्ञान मंथन, 2020-21” नामक उपक्रमाचा प्रारंभ कोणत्या मंत्रालयाने केला?

*उत्तर* : आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

● तीन राजधान्या असणारे कोणते राज्य देशातले पहिलेच राज्य ठरले?

*उत्तर* : आंध्रप्रदेश

● ‘फॉर्म्युला वन ब्रिटीश ग्रँड प्रिक्स 2020’ ही शर्यत कोणी जिंकली?

*उत्तर* : लेविस हॅमिल्टन (87 वा विजय)

● अरब जगतातली पहिली अणुभट्टी कोणत्या देशात आहे?

*उत्तर* : संयुक्त अरब अमिरात

● “2020 बीएल आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महोत्सव’ या स्पर्धेत कोणत्या व्यक्तीने द्वितीय क्रमांक मिळवला?

*उत्तर* : हरिकृष्ण पेंटाला

Q1) कोणत्या मंत्रालयाने ‘स्वच्छ भारत मिशन अकादमी’ याची स्थापना केली?
उत्तर :- जलशक्ती मंत्रालय

Q2) कोणाच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे ‘कनेक्टिंग, कम्युनिकेटिंग, चेंजिंग’ या शीर्षकाचे पुस्तक आहे?
उत्तर :- उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

Q3) कोणत्या केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाने प्रथमच आभासी लोक अदालत भरवली?
उत्तर :- दिल्ली

Q4) कोणते मंत्रालय ‘आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय’ उभारत आहे?
उत्तर :- आदिवासी कल्याण मंत्रालय

Q5) कोणत्या राज्यातली महानगरपालिका शहरी भागात लोकांना वनभूमीचे प्रमाणपत्र वाटप करणारी भारतातली पहिली ठरली?
उत्तर :-  छत्तीसगड

Q6) पाच इको टूरिझम क्षेत्रांच्या विकासासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला?
उत्तर :- मालदीव

Q7) कोणता देश कोविड-19 लस नोंदविणारा जगातला पहिला देश ठरला?
उत्तर :- रशिया

Q8) कोणती व्यक्ती पेरू देशाचे नवे पंतप्रधान आहे?
उत्तर :- वॉल्टर रॉजर मार्टोस रुईझ

Q9) कोणत्या संस्थेनी ‘कृषी मेघ’ केंद्राची स्थापना केली?
उत्तर :- भारतीय कृषी संशोधन परिषद

Q10) 2020 साली आंतरराष्ट्रीय युवा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर :-  यूथ एंगेजमेंट फॉर ग्लोबल अॅक्शन


Q1) कोणत्या राज्य सरकारने खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी ‘मुख्यमंत्री शेतकरी सहाय्य योजना’ लागू केली?
उत्तर :- गुजरात

Q2) कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादीत (SAIL) या उपक्रमाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?
उत्तर :-  सोमा मोंडल

Q3) कोणते शहर स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्त्री-स्वरूपात वाहतूक सिग्नल मिळविणारे पहिले ठरले?
उत्तर :- मुंबई

Q4) कोणत्या संस्थेनी “BEEG” या नावाने देशी ‘सीड बॉल’ विकसित केले आहेत?
उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर

Q5) ‘70th अॅनिव्हर्सरी ग्रँड प्रिक्स 2020’ या शर्यतीचा विजेता कोण ठरला?
उत्तर :- मॅक्स व्हर्स्टपेन

Q6) कोणत्या संस्थेनी भारतभर ‘W-GDP विमेन कनेक्ट चॅलेंज’ उपक्रम राबविण्यासाठी USAID संस्थेसोबत भागीदारी करार केला?
उत्तर :- रिलायन्स फाऊंडेशन

Q7) कोणत्या कंपनीने “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 2.0” यासाठी अटल इनोव्हेशन मिशन (AIM) सोबत भागीदारी केली?
उत्तर :- डेल टेक्नॉलॉजीज

Q8) कोणत्या संस्थेच्यावतीने ‘इंडिया@ 75 समिट: मिशन 2022’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते?
उत्तर :-  भारतीय उद्योग संघ (CII)

Q9) कोणत्या व्यक्तीची भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन मंडळाचे (ICRIER) अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?
उत्तर :- प्रमोद भसीन

Q10) कोणत्या व्यक्तीने पश्चिम बंगालमधून बांग्लादेशमार्गे त्रिपुराच्या आगरतळाकडे जाणाऱ्या पहिल्या चाचणी मालवाहू जहाजाला हिरवा झेंडा दाखविला?
उत्तर :-  मनसुख मांडवीया


Q1) निधन झालेले पी. के. मुथूसामी कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होते?
उत्तर :-संगीत

Q2) कोणती संस्था ‘गृहनिर्माण किंमत निर्देशांक’ जाहीर करते?
उत्तर :- भारतीय रिझर्व्ह बँक

Q3) कोणत्या देशात ‘ग्रेटर माले कनेक्टिव्हिटी’ प्रकल्प हा देशातला सर्वात मोठा पायाभूत प्रकल्प राबविण्यात येणार आहे?
उत्तर :-  मालदीव

Q4) कोणत्या संस्थेच्यावतीने 15 ऑगस्ट ते 02 ऑक्टोबर 2020 या कालावधीत 'फिट इंडिया फ्रीडम रन' ही धावशर्यत आयोजित करण्यात आली?
उत्तर :- युवा कल्याण व क्रिडा मंत्रालय

Q5) कोणत्या संस्थेला ‘ओमेगा सेंटौरी’ या गोल गुच्छच्या धातू-समृद्ध नमुन्यात हेलियमयुक्त-वर्धित शीत चमकदार तारे आढळून आले आहेत?
उत्तर :- भारतीय खगोलभौतिकशास्त्र संस्था

Q6) कोणता संघ ऑलिम्पिकमधील भारताच्या सहभागाची शताब्दी साजरा करीत आहे?
उत्तर :- डेक्कन जिमखाना क्लब

Q7) 'एयर बबल' कराराच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारचे वैध व्हिसा असलेले भारतीय प्रवासी कोणत्या देशाकडे प्रवास करू शकतात?
उत्तर :- ब्रिटन,अमेरिका,कॅनडा

Q8) कोणती संस्था “देखो अपना देश” या संकल्पनेखाली वैविध्यपूर्ण वेबिनार मालिका आयोजित करीत आहे?
उत्तर :-  पर्यटन मंत्रालय

Q9) 13 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या एका गस्ती जहाजाचे जलावतरण करण्यात आले. त्या जहाजाचे नाव काय आहे?
उत्तर :- सार्थक

Q10) कोणत्या देशाने व्हिएतनामसोबत मत्स्यव्यवसायाचे व्यवस्थापन आणि कायद्याची अंमलबजावणी क्षमता बळकट करण्यासाठी एक सामंजस्य करार केला?
उत्तर :-  संयुक्त राज्ये अमेरिका


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...