Saturday, 29 August 2020

भारतात जाऊ नका; ट्रम्प सरकारचा नागरिकांना सल्ला



⚡️ भारत आणि अमेरिकेमधील परराष्ट्र संबंध मागील काही काळापासून सुधारल्याचे दिसत आहे. मात्र अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारतासंदर्भात कठोर पावले उचलत अमेरिकन नागरिकांना भारतामध्ये न जाण्याचा सल्ला दिला आहे.

💁‍♂️ अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी अशाप्रकारच्या सूचना का दिल्या आहेत याबद्दलचे कारण स्पष्ट केले नाही. मात्र अशाप्रकारच्या सूचना या दहशतवाद, एखाद्या प्रदेशात होणारे युद्ध, वाढती गुन्हेगारी आणि साथीच्या रोगांच्या काळात दिल्या जातात.

👀 *रँकिंग* : अमेरिकेने प्रवासासंदर्भात भारताचे रँकिंग चार निश्चित केले आहे. हा सर्वात वाईट रँकिंग असल्याचे सांगितले जाते.

👎🏼 *यादी* : हे रँकिंग देत अमेरिकेने भारताचा समावेश युद्ध सुरु असणाऱ्या सीरिया, दहशतवादाचे केंद्र म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तान, इराण, इराक आणि येमेनसारख्या देशांच्या यादीमध्ये केला आहे.

🙏 *सल्ला* : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेत ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन नागरिकांना भारतात न जाण्याचा सल्ला दिला आहे.

📍 *वाढ* : अमेरिकन सुरक्षा यंत्रणांच्या सांगण्यानुसार कोरोनाबरोबरच भारतामध्ये गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : 

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...