Sunday, 16 August 2020

संरक्षण क्षेत्रातल्या सार्वजनिक आधुनिकीकरण प्रकल्प तसेच नवीन पायाभूत सुविधांचे उद्घाटन.



🔰संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते 10 ऑगस्ट 2020 रोजी ‘आत्मनिर्भर भारत’ सप्ताहाच्या अंतर्गत संरक्षण क्षेत्रातले सार्वजनिक उपक्रम तसेच दारुगोळा निर्मिती मंडळ (OFB) यांच्या अंतर्गत येणाऱ्या सुविधांचे आधुनिकीकरण तसेच नवीन पायाभूत सुविधांचे डिजीटल माध्यमातून उद्घाटन करण्यात आले.

🔴आधुनिकीकरण उपक्रमाच्या अंतर्गत,

🔰ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा येथील पिनाक रॉकेट कॉम्प्लेक्स येथे पिनाक आणि इतर अग्निबाणासाठी लागणाऱ्या विस्तारीत गरजांच्या पूर्ततेसाठी अत्याधुनिकीकरण करण्यात आले आहे.

🔰OLF देहरादून याच्या अत्याधुनिकीकरणामुळे टी-90 रणगाड्यांच्या अत्याधुनिक ऑप्टोइलेक्ट्रॉनिक घटकांची निर्मिती होणार.

🔰भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपनीने उत्पादनासाठी पूर्णपणे स्वदेशी ‘मरीच’ एकात्मिक सुविधा तयार केली आहे, DRDOने विकसित केलेल्या टॉर्पेडो-भेदी संरक्षण प्रणालीचे मरीचसोबत एकत्रीकरण आणि चाचणी केली आहे.

🔰हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या कंपनीने ‘500 वे AL-31FP ओव्हरहाल्ड इंजिन’ भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द केले आहे, जे Su-30MKI या लढाऊ विमानात बसविण्यात येणार आहे. हे कोरापुट विभागाने तयार केले आहे.

🔰BEML लिमिटेडने बेंगळुरु येथे नवीन पायाभूत सुविधानिर्माण अंतर्गत औद्योगिक संरचना केंद्र उभे केले आहे. भारतातले अशाप्रकारचे हे पहिलेच केंद्र आहे.

🔰गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजीनियर्स या कंपनीने सध्या सुरु असलेल्या P17A प्रकल्पाच्या उत्पादन गरजा पूर्ण करण्यासाठी राजा बागान डॉकयार्ड येथे सुविधा विस्तार केला.

🔰कोंकरस-एम, इनवार, आकाश, अस्त्र क्षेपणास्त्रांसाठी आवश्यक असलेल्या स्वदेशी विकसित युद्धसामुग्रीचे उत्पादन व चाचणी करण्यासाठी संरक्षण क्षेत्रात नवीन पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. ही सुविधा मॉड्यूलर असल्याने वाढीव सुधारणांसह भविष्यातल्या सर्व क्षेपणास्त्र आयुधांना पुरवली जाणार.

🔴पार्श्वभूमी...

🔰पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचे आवाहन केले आहे. हा ‘5-I’ सूत्री कार्यक्रम आहे - हेतू (Intent), समावेश (Inclusion), गुंतवणूक (Investment), पायाभूत सुविधा (Infrastructure) आणि नवोन्मेष (Innovation). संरक्षण क्षेत्राने या क्षेत्राच्या विकासासाठी अनेक पुढाकार घेतले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...