Tuesday, 13 June 2023

आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर

जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंबर्ले  येथे इ.स. ६ जानेवारी १८१२ रोजी झाला.

🌷  बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स.१८२५  साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले.

☘  मुंबईत येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले.

🌷  ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’मध्ये डेप्युटी सेक्रेटरी या महत्त्वाच्या पदावर रुजू झाले.

🌷   इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते (असिस्टंट प्रोफेसर) म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली 

☘  यानंतर शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून काम केले. मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली होती. 

🌷  आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आद्य मराठी वृत्तपत्राचे जनक, आद्य इतिहास संशोधक, सुधारवाद्यांचे प्रवर्तक, शिक्षकतज्ञ, जेष्ट पत्रकार, एक प्रगमनशील व्यवहारवादी सुधारक म्हणून ओळखले जाते

☘   ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. 
इ.स. १७ मे १८४६ रोजी बनेश्वर येथे त्यांचा मृत्यू झाला

✨🍃✨🍃✨🍃✨🍃✨🍃✨🍃✨

📕  सामाजिक कार्य   📕

🖍  सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी  या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली.

🖍  जांभेकर यांना ज्ञानेश्‍वरीची पहिली मुद्रित आवृत्ती इ.स. १८४५ साली काढली

🖍  त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा प्राचीन, इतिहास, शून्यलब्धी, सार संग्रह, या ग्रंथांचा समावेश आहे.

🖍  १८३२ मध्ये ‘दर्पण’ हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. ‘दिग्दर्शन’ हे मासिकसुद्धा त्यांनी सुरु केले

🖍  बाळशास्त्रींनी साधारणपणे इ.स. १८३० ते इ.स. १८४६ या काळात आपले योगदान महाराष्ट्राला व भारताला दिले

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...