Tuesday, 3 January 2023

गांधी युगातील महत्वाच्या घटना :





🔶गांधी युगाचा उदय :

सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला.

आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले.

जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.

1. भारतातील चळवळी :

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.
चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) –

चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली.

साराबंधी चळवळ (सन 1918) –

1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.
गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली.
शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
हा गांधीजीचा दूसरा विजय होता.

रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) –

भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.
या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता.
या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय.

13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.
या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.

सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले.

फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली.

या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.

या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.

3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या.
असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.

4. सायमन कमिशन (1928) :

भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले.
या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते.
या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते.
या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.

5. नेहरू रिपोर्ट (1928) :

भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले.
राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली.
नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...