Saturday, 22 August 2020

रायगड आणि जगदलपूर येथे ‘ट्रायफूड प्रकल्प’चा शुभारंभ.



🔰20 ऑगस्‍ट 2020 रोजी केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांच्या हस्ते रायगड (महाराष्ट्र) आणि जगदलपूर (छत्तीसगड) या शहरांमध्ये ट्रायफेड संस्थेच्या “ट्रायफूड प्रकल्प”च्या प्रक्रिया केंद्रांचा आभासी शुभारंभ करण्यात आला.

🔰रायगडचा कारखाना मोह, आवळा, सीताफळ आणि जांभळाच्या मूल्यवर्धनासाठी वापरला जाणार आणि मोह सरबत, आवळा सरबत, कँडी, जांभळाचे सरबत आणि सीताफळाचा गर तयार करणार. जगदलपूरच्या बहुविध प्रक्रिया केंद्राचा वापर मोह, आवळा, मध, काजू, चिंच, आले, लसूण आणि इतर फळे तसेच भाज्याच्या प्रक्रियेसाठी केला जाणार. मोह सरबत, आवळा रस, कँडी, शुद्ध मध, आले-लसूण मिश्रण आणि फळ आणि भाज्यांचा लगदा बनवला जाणार.

🔴टरायफूड प्रकल्पाविषयी...

🔰टरायफूड प्रकल्पाचा उद्देश दोन्ही घटकांना त्याच्या इच्छित गुणवत्तेत रूपांतरित करणे हा आहे. अन्नप्रक्रिया मंत्रालयाच्या सहकार्याने आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या ट्रायफेड संस्थेकडून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार असून आदिवासीं वन मजुरांनी गोळा केलेल्या वन्य उत्पादनांचे योग्य मूल्यवर्धन आणि योग्य वापराद्वारे आदिवासींचे उत्पन्न वाढवणे हे ट्रायफूड प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. हे साध्य करण्यासाठी प्रारंभी दोन गौण वन उत्पादन (MFP) प्रक्रिया कारखान्यांची स्थापना करण्यात येणार आहे.

🔰अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने  प्रधानमंत्री किसान संपदा योजनेच्या अंतर्गत स्थापन करण्यात येणारे कारखाने राज्यातल्या वन धन केंद्राकडून कच्चा माल खरेदी करणार. संपूर्ण प्रक्रिया केलेली उत्पादने संपूर्ण देशात ‘ट्राइब इंडिया’ दुकानात आणि नेमलेल्या दुकानांमध्ये विकली जाणार. शिवाय, उत्पादने विक्री करू शकतील अशा आदिवासी उद्योजकांना निवडून प्रशिक्षण देण्याची ट्रायफेड संस्थेची योजना आहे.

🔴इतर ठळक बाबी..

🔰टरायफेड संस्थेनी देशातल्या 21 राज्य सरकारच्या संस्थांच्या सहकार्याने राबवलेल्या या योजनेमुळे आदिवासी अर्थव्यवस्थेत आतापर्यंत 3000 कोटीं रुपयांपेक्षा अधिक निधी आला आहे.

🔰म 2020 मध्ये सरकारकडून चालना देताना गौण वन उत्पादनांच्या किंमती 90 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आल्या आणि 23 नवीन वस्तूंचा समावेश MFPच्या यादीमध्ये करण्यात आला.

🔰आदिवासी जमाती आणि वनवासी तसेच घरगुती आदिवासी कारागीर यांना रोजगार निर्मितीचा स्रोत म्हणून उदयाला आलेली वन धन विकास केंद्र / आदिवासी स्टार्टअप उद्योग देखील याच योजनेचा एक घटक आहे.

🔰22 राज्यांतल्या 3.6 लक्ष आदिवासी जमातींना आणि 18000 बचत-गटांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 18500 बचतगटांमध्ये 1205 आदिवासी उपक्रमांची स्थापना केली आहे.

🔴TRIFED विषयी..

🔰भारतीय आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ (TRIFED) या संस्थेचे कामकाज आदिवासी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत चालते. संस्थेची स्थापना 06 ऑगस्ट 1987 रोजी झाली.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...