Wednesday 5 August 2020

नासाचे दोन अवकाशवीर रविवारी सुरक्षितपणे पृथ्वीवर.

🔰अमेरिकेतील उद्योगपती इलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या ड्रॅगन (आता एंडेव्हर) अवकाशकुपीच्या माध्यमातून अवकाशात गेलेले नासाचे दोन अवकाशवीर रविवारी सुरक्षितपणे पृथ्वीवर आले.

🔰नासाने त्यांच्या अवकाशवीरांना अवकाश स्थानकात नेण्याआणण्याचे कंत्राट आता स्पेस एक्स कंपनीला दिले आहे.

🔰बोईंग कंपनीला ही संधी देण्यात आली होती पण त्यांना तसे अवकाशवाहन तयार करण्यात तातडीने यश मिळवता आले नाही.

🔰ही अवकाशकुपी दोन महिन्यांपूर्वी फ्लोरिडातून सोडण्यात आली होती व ती अवकाशस्थानकाजवळ गेल्यानंतर तेथेच होती.नंतर या अवकाशवीरांचे वास्तव्य पूर्ण झाल्यानंतर त्याच कुपीत बसून ते परत आले.

🔰याचा अर्थ यात खूप मोठय़ा प्रमाणावर पैशांची बचतही झाली आहे.स्पेस एक्स कंपनीने अवकाशवीरांना आणण्यासाठी परिचारिका व डॉक्टरांचा समावेश असलेले खास जहाज तयार ठेवले होते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...