Tuesday, 18 August 2020

जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्याला ‘निशान-ए-पाकिस्तान’ पुरस्कार.



🔰पाकिस्ताननं आपल्या स्वातंत्र्यदिनी हुर्रियतचे माजी आणि फुटीरतावादी नेते सैय्यद अली शाह गिलानी यांनी आपल्या सर्वोच्च नागरिकाचा सन्मान देण्यात आला आहे. शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी गिलानी यांनी ‘निशान-ए-पाकिस्तान’ हा पुरस्कार देण्यात आला. गिलानी हे फुटीरतावादी नेते असून त्यानी अनेकदा काश्मीरमध्ये भारतविरोधी वक्तव्यही केली होती. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननं आपला नवा नकाशा जारी केला होता. त्यात काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचंही दाखवण्यात आलं होतं.

🔰सवातंत्रदिनी इस्लामाबादमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात गिलानी यांना निशान-ए-पाकिस्तान देण्यात आला. माजी हुर्रियत नेते गिलानी यांना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरिफ रिझवी यांनी हा पुरस्कार दिला. दरम्यान, या कार्यक्रमाला गिलानी हे उपस्थित नव्हते. त्यांच्या ऐवजी काही हुर्रियतच्या नेत्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यापूर्वी गिलानी यांना सन्मानित करण्यात येईल, असंही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितलं होतं.

🔰पाकिस्तानी सिनेटर मुश्ताक अहमद यांनी गिलानी यांना निशान-ए-पाकिस्तान देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर संसदेत आवाजी मतदानाद्वारे या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. गिलानी यांनी काही दिवसांपूर्वीच हुर्रियतमधून आपला राजीनामा दिला होता. काश्मीरमधील दहशतवाद आणि हिंसेचा आरोप असलेल्या आरोपींमध्ये त्यांचा समावेश आहे. २०१६ मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हिसाचारानंतर टेरर फंडिंगचादेखील आरोप करण्यात आला होता. तर बऱ्याच कालावधीसाठी गिलानी यांना त्यांच्या घरात नजरकैदेतही ठेवण्यात आलं होतं.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...