Thursday, 20 August 2020

सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर.


🔰नसर्गिक शेती ही काही भारतामध्ये नवीन संकल्पना नाही. शेतीचे सेंद्रिय अवशेष, गाईचे शेण, पालापाचोळा कुजवून तयार करण्यात आलेले खत, यांचा वापर शेतीमध्ये केला जातो.

🔰सद्रिय उत्पादनाला केवळ भारतामध्येच नाही तर जागतिक पातळीवर सातत्याने मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. निरोगी शरीरासाठी सुरक्षित अन्नधान्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून वाढत आहे. त्यामुळे शेतामध्ये रसायनांचा, रसायनिक खतांचा वापर करणे टाळून सेंद्रिय शेती करण्याला सिद्ध असलेल्या शेतकरीच्या दृष्टीने चांगल्या संधी निर्माण होत आहेत.

🔴भारतातली सेंद्रिय शेती...

🔰सद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात प्रथम क्रमांकावर आहे. तर सेंद्रिय शेतीच्या क्षेत्राचा विचार केला तर भारत नवव्या क्रमांकावर आहे.सिक्कीम या संपूर्ण राज्यामध्ये केवळ सेंद्रिय शेती केली जाते. पूर्णतः सेंद्रिय शेती करणारे हे जगातले पहिले राज्य ठरले आहे.

🔰सिक्कीम पाठोपाठ त्रिपुरा आणि उत्तराखंड या राज्यांनी आपल्या क्षेत्रात संपूर्णपणे सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ईशान्य भारतामध्ये पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय शेती केली जाते. या भागात रासायनिक खतांचा वापर इतर देशांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी करतात. त्याचबरोबर आदिवासी आणि इतर लहान बेटांवरही सेंद्रिय शेती करण्यात येत आहे.

🔰रसायनमुक्त, सेंद्रिय शेती व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन योजना तयार करण्यात आल्या आहेत - ‘मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्ट रिजन’ (MOVCD) आणि ‘परंपरागत कृषी विकास योजना’ (PKVY). या योजना 2015 साली लागू करण्यात आल्या. त्याच्याच जोडीला ‘कृषी निर्यात धोरण 2018’ तयार करण्यात आल्यामुळे सेंद्रिय कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत खूप चांगली मागणी निर्माण होऊ लागली.

🔰भारतीय सेंद्रिय बाजारपेठ
भारताने 2018-2019 या आर्थिक वर्षात 5,151 कोटी रुपयांच्या सेंद्रिय कृषी उत्पादनाची निर्यात केली. या निर्यातीमध्ये जवळपास 50 टक्के वाढ झाली आहे.

🔰उत्पादनांमध्ये प्रामुख्याने अंबाडीचे बी, जवस, तीळ, सोयाबीन, चहा, वनौषधी, तांदूळ आणि डाळी यांचा समावेश आहे.
परंपरागत कृषी विकास योजनेमधून सुमारे 40,000 शेतकी समूह तयार करण्यात आले असून त्यामध्ये 7 लक्ष हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे.

🔰‘मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट फॉर नॉर्थ ईस्ट रिजन (MOVCD) अंतर्गत 160 कृषी उत्पादन संघटनांच्या (FPO) माध्यमातून 80 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे.

🔰ह सर्व शाश्वत समूह ठरावेत यासाठी बाजारपेठेतल्या मागणीचा विचार करून उत्पादनाच्या कराराची पद्धती स्वीकारण्यात आली आहे. त्यामुळे आलेल्या उत्पादनाला तयार बाजारपेठ उपलब्ध होत आहे. तसेच गरजेनुसार उद्योजकांना योग्य गुणवत्तेचे उत्पादन मिळण्यासही मदत होत आहे.

🔰आले, हळद, काळे तांदूळ, मसाले, पोषक तृणधान्य, अननस, औषधी वनस्पती, गव्हाचे तृण, बांबूचे कोवळे कोंब, इत्यादींचा पुरवठा उद्योगांना करण्यात येत आहे. मेघालयातून मदर डेअरी, रेवांता अन्न आणि मणीपूरातून बिग बास्केट या कंपन्यांना सेंद्रिय उत्पादने पुरवली जातात.

🔰सद्रिय उत्पादनाला बाजारपेठ निर्माण करणे, तसेच थेट विक्री करणे यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये काम केले जात आहे. त्यामुळे लोकांना आपल्या दारामध्ये ताजी सेंद्रिय उत्पादने मिळू लागली आहेत. तसेच पंजाबमध्ये विशेष प्रकारे तयार करण्यात आलेल्या विजेरी वाहनांच्या माध्यमातून लोकांना घरपोच सेंद्रिय उत्पादने मिळत आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...