Tuesday 11 August 2020

दिल्ली सरकारचे नवीन “विजेरी वाहन धोरण”

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन “विजेरी वाहन धोरण” सादर केले. दिल्ली सरकारने दिल्लीमध्ये विजेरी वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नवे धोरण तयार केले आहे.

या धोरणाच्या अंतर्गत नव्या विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या खरेदीवर अनुदान दिले जाणार आहे.
दुचाकी, तीनचाकी, ई-रिक्षा तसेच मालवाहतूक ई-वाहनांसाठी 30 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

तर विजेरी मोटारकारच्या खरेदीवर दीड लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
केंद्र सरकार त्यांच्या योजनेच्या अंतर्गत जे अनुदान देत आहे त्यावर हे अधिकचे अनुदान असणार आहे.

सरकारची इतर तयारी
पुढच्या 5 वर्षात दिल्लीत पाच लक्ष नवीन विजेरी वाहनांची नोंद करण्यात येणार असे अपेक्षित आहे. याचबरोबर, विजेरी वाहनांसाठी सरकार चार्जिंग केंद्रांचे जाळे तयार करणार आहे. एका वर्षात 200 चार्जिंग केंद्र तयार करण्याचे ध्येय थरविण्यात आले आहे.

दर तीन किलोमीटरवर चार्जिंग केंद्र मिळण्यासाठी तयारी केली जात आहे. अश्या वाहनांच्या खरेदीवर कर्जावरील व्याजात सूट देण्यासोबतच सर्व नव्या विजेरी वाहनांचा रस्ता कर आणि इतर शुल्क पूर्ण माफ करण्यात येणार आहे.

✅ भारत सरकारची ‘फेम इंडिया’ योजना 👇

केंद्र पुरस्कृत “फेम इंडिया” (फास्टर अडोप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड अँड इलेक्ट्रिकइलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया) योजनेच्या अंतर्गत ‘विजेवर चालणार्‍या’ वाहनांच्या खरेदीवर अनुदान मिळते. सरकार बसच्या खरेदीवर 60 टक्के, चारचाकी वाहनावर 1.24 लक्ष रुपये आणि तीनचाकी वाहनावर 61,000 रुपयांचे अनुदान देते. तसेच चार्जिंगच्या पायाभूत सुविधेच्या स्थापनेसाठी सुद्धा अनुदान देते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...