Monday, 3 August 2020

भारताचा “ग्रीन-अॅग” प्रकल्प..

🔰कृषी क्षेत्रात होणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनाच्या प्रमाणात घट करण्यासाठी आणि शाश्वत शेतीपध्दती सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने नवा “ग्रीन-अॅग” (Green-Ag) प्रकल्प चालवत आहे. प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प मिझोरम राज्यात राबवला जात आहे.

🔴ठळक बाबी...

🔰हा मिश्र भूमीपयोगी प्रणालींसह पाच प्रकारच्या भूमीवर कमीतकमी 1.8 दशलक्ष हेक्टर क्षेत्रात बहुविध जागतिक पर्यावरणविषयक लाभ मिळविण्यासाठी तयार केलेला प्रकल्प आहे.

🔰कमीतकमी 1,04,070 हेक्टर भूमी शाश्वत शेतजमीन आणि जलव्यवस्थापनाच्या अंतर्गत आणणे हे या कार्यक्रमामागचे उद्दीष्ट आहे.

🔰शाश्वत पद्धतींच्यामार्फत जवळपास 49 दशलक्ष कार्बन डायऑक्साईड वायूचे वातावरणात उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.

🔰हा प्रकल्प प्रारंभी मध्यप्रदेश, ओडिशा, उत्तराखंड, मिझोरम आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये राबवला जाणार आहे. पुढे संपूर्ण भारतात यांची अंमलबजावणी होणार.

No comments:

Post a Comment