Thursday, 20 August 2020

चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे



● जगातल्या महासागराच्या सर्वाधिक ज्ञात खोलीवर तळाशी पोहोचणारी पहिली महिला आणि व्यक्ती कोण?
: कॅथी सुलिव्हन (अमेरिका - 1984 साली)

● संयुक्त संशोधन, उत्पादनांच्या चाचणी व प्रमाणीकरणासाठी IFFCO या संस्थेसोबत कोणत्या संस्थेनी सामंजस्य करार केला?
: भारतीय कृषी संशोधन परिषद

● युवांना विविध व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबत कोणती संस्था करार करीत आहे?
 : राष्ट्रीय खते मर्यादित

● ‘पूनम अवलोकन’ या अभ्यासाद्वारे कोणत्या प्राण्याची संख्या मोजली गेली?
 : सिंह

● भारतातल्या डिप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेइकल (DSRV) कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले?
: विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश)

● चेन्नई आणि बेंगळुरू या शहरांमध्ये सुरूवात झालेल्या CBICच्या प्रमुख कार्यक्रमाचे नाव काय?
 : तुरंत कस्टम्स

● मर्सेर संस्थेच्या '2020 कॉस्ट ऑफ लिव्हिंग' अहवालानुसार भारतातले सर्वात महागडे शहर म्हणून कोणत्या शहराला ठरविण्यात आले?
 : मुंबई

● “ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाचा अहवाल कोणत्या संघटनेनी प्रसिद्ध केला?
 : जागतिक बँक


● यंदा 2020 सालची जागतिक रक्तदाता दिनाची संकल्पना काय होती?
 : सुरक्षि‍त रक्त, जीव वाचवते

● भारतीय नौदलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
: बिस्वजीत दासगुप्ता (वाईस अ‍ॅडमिरल)

● ‘जगनन्ना चेडोडू’ योजना कोणत्या राज्यात लागू करण्यात आली?
 : आंध्रप्रदेश

● ‘पूर्णपणे डिजिटल’ कार्यभार चालविणारी बांधकाम क्षेत्रातली पहिली संस्था कोण?
 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)

● संकेतस्थळ आधारित ‘आरोग्यपथ’ या नावाचे व्यासपीठ कोणत्या संस्थेनी कार्यरत केले?
: वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

● ‘कॅप्टन अर्जुन’ रोबोट कोणत्या शहराच्या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले आहे?
 : पुणे रेल्वे स्थानक

● आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागृती दिन कधी साजरा केला जातो?
 : 13 जून

● ‘घर घर निगरानी’ मोबाईल अ‍ॅप कोणत्या राज्य सरकारने तयार केले?
 : पंजाब

● आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार समजला जातो?
 : रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड

● वायूच्या वितरणासाठी भारतातले पहिले व्यापार मंच कोणत्या मंडळाने तयार केले?
 : इंडियन एनर्जी एक्सचेंज

● SAUNI योजना कोणत्या राज्यात राबविली जात आहे?
 : गुजरात

● वृद्ध लोकांसोबत गैरवर्तन विषयक जागतिक जागृती दिनाची यंदाची (2020) संकल्पना काय होती?
 : “लिफ्टिंग अप व्हॉईसेस”

● भारतीय निर्यात-आयात बँकेनी (EXIM बँक) कोणत्या देशाला 215.68 दशलक्ष डॉलर इतक्या पतमर्यादेची (LOC) घोषणा केली?
: मलावी (आफ्रिका)

● संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘कुटुंबाला रक्कम पाठवणे विषयी आंतरराष्ट्रीय दिन’ कधी पाळला जातो?
: 16 जून

● कोणत्या देशात “SIPRI ईयरबुक 2020” हा अहवाल प्रकाशित करणारी संस्था आहे?
 स्वीडन

● यंदाची (2020) ‘जागतिक बालमजुरी विरोधी दिन’ची संकल्पना काय होती?
: कोविड-19: प्रोटेक्ट चिल्ड्रेन फ्रॉम चाइल्ड लेबर, नाऊ मोअर दॅन एव्हर

● यंदाची (2020) आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना काय होती?
: “योग फॉर हेल्थ-योग अ‍ॅट होम”

● नवसंशोधन आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अटल नवसंशोधन अभियान (AIM) सोबत कोणत्या संस्थेनी भागीदारी केली?
: कोल इंडिया लिमिटेड (CIL)

● अंटार्क्टिकामध्ये प्रथमच अंड्याचे जीवाश्म सापडले आहे. या जीवाश्मला काय नाव देण्यात आले आहे?
: ‘द थिंग’

● यंदाची (2020) जागतिक जल-सर्वेक्षण दिनाची संकल्पना काय होती?
: हायड्रोग्राफी एनेबलिंग ऑटोनोमस टेक्नॉलजीज

● जागतिक बँकेनी बांगलादेशला 1.05 अब्ज डॉलर एवढी रक्कम कोणत्या प्रकल्पाला वित्तपूरवठा करण्यासाठी मंजूर केली?
: प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड डिजिटल आनत्रेप्रेनेऊरशिप

● ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’  दुसऱ्या कोणत्या नावाने संबोधले जाते?
 : रिंग ऑफ फायर

● ‘BMW इंडिया’ या कंपनीचे नवे अध्यक्ष कोण आहेत?
 : विक्रम पवाह (1 ऑगस्ट 2020 पासून)

● अन्नसुरक्षेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाय विकसित करण्यासाठी जागतिक खाद्यान्न कार्यक्रमासोबत कोणत्या संस्थेनी भागीदारी केली?
: भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली


● संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय संक्रांतीचा उत्सव दिन (International Day of the Celebration of the Solstice) कधी साजरा केला जातो?
: 21 जून

●  पहिली आभासी ‘आरोग्यसेवा व वैयक्तिक स्वच्छता प्रदर्शनी 2020’ कोणत्या संस्थेनी आयोजित केली?
: फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री

● ‘इंदिरा रसोई योजना’ कोणत्या राज्य सरकारने जाहीर केली आहे?
 : राजस्थान

● ‘स्टँडर्ड चार्टर्ड बँक ऑफ इंडिया’चे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली?
: गौरव माहेश्वरी

● दरवर्षी ‘ऑलिम्पिक दिन’ कधी साजरा केला जातो?
: 23 जून

● “लिजेन्ड ऑफ सुहेलदेव: द किंग हू सेव्ह्ड इंडिया” हे शीर्षक असलेले पुस्तक कोणी लिहिले?
: अमिश त्रिपाठी (लंडन नेहरू सेंटर, संचालक)

● ‘भारतीय वित्तीय तंत्रज्ञान व संबंधित सेवा (IFTAS)’ याचे अध्यक्ष या पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली?
: टी. रबी शंकर

● ‘रत्न व दागिने निर्यात जाहिरात परिषद’चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले?
 : कोलिन शाह



● भारताबाहेरील पहिल्या योग विद्यापीठाचे नाव काय?
: ‘विवेकानंद योग विद्यापीठ’ (VAYU)

● समुदायाप्रती सार्वजनिक सेवेचे मूल्य आणि विकास प्रक्रिया याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘संयुक्त राष्ट्रसंघ लोकसेवा दिन’ कधी साजरा केला जातो?
 : 23 जून

●  मुख्यमंत्री दूरस्थ शिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी हरयाणा सरकारसोबत कोणत्या कंपनीने करार केला?
: रिलायन्स जिओ

● ‘बीदौ उपग्रह प्रणाली’चे प्रक्षेपण कोणत्या देशाने पूर्ण केले आहे?
: चीन

● ‘जिवाणू पेशी’चे आवरण नष्ट करणारे ‘नॅनोझाइम’ कोणत्या संस्थेनी विकसित केले आहे?
 : भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरु

● प्रथम ऑनलाइन ‘कान चित्रपट महोत्सव-2020’ मधील आभासी ‘इंडिया पॅव्हिलियन’चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
 : प्रकाश जावडेकर (माहिती व प्रसारणमंत्री)

● चीनचा ‘दिओयू’ बेट यांच्या मालकी मुद्द्यावरून जापान आणि तैवान सोबत वाद चालू आहे. अलीकडेच जापानने या बेटाला दिलेले नवीन नाव काय आहे? 
 : ‘टोनोशिरो सेनकाकू’

● रमेश पोखरियाल यांनी उद्घाटन केलेल्या द्वितीय आवृत्तीच्या YUKTI योजनेचे पूर्ण नाव काय?
: Young India combating COVID with Knowledge, Technology, and Innovation


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...