Sunday, 16 August 2020

राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरुम’ वर भरणार; महाराष्ट्र देशातील पहिलंच राज्य





📚 सध्या शाळा बंद असतानाही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरूम’च्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी शासनाने गुगलबरोबर करार केला आहे.

👨🏻‍💻 *गूगल क्लासरूमने काय होणार?*

▪️या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोठेही, कधीही शिकता येऊ शकेल.
▪️ विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच शिक्षक या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सराव घेऊ शकतील.
▪️ विद्यार्थ्यांना प्रकल्प देऊन त्यांचे मूल्यमापनही करू शकतील.
▪️ आतापर्यंत सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी नोंदणी केली आहे.
▪️ गरामीण भागातील विद्यार्थ्यांनाही यामुळे दर्जेदार शिक्षणाची संधी मिळेल.
▪️ कोरोना संकटात शिक्षणासाठी डिजिटल क्रांतीचा योग्य वापर करून संधीत रूपांतर  झाले आहे.

🗣️ "सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहे",असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.

👥 या प्रकल्पाचे गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, गुगलचे भारतातील विक्री प्रमुख संजय गुप्ता यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 02 जानेवारी 2025

◆ लीना नायर(कोल्हापूर) यांना ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील 'कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' (CBE) हा प्रतिष्ठे...