Tuesday 18 August 2020

भारतदर्शन : सिक्कीम



🔰16 मे हा सिक्कीम राज्याचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो.

🔰1975 साली याच दिवशी सिक्कीम भारतीय संघराज्याचे 22 वे राज्य बनले.

🔰 जगातील तिसरे व भारतातील सर्वोच्च शिखर कांचनजुंगा याच राज्यात आहे.

🔰 राज्याचा सुमारे 35 टक्के भाग खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यानाने व्यापलेला आहे. वेलची उत्पादनात या राज्याचा जगात दुसरा क्रमांक आहे.

🔰 सपूर्ण सेंद्रिय शेती करणारे हे भारतातील पहिले व एकमेव राज्य आहे. प्लास्टिक बाटल्या व पॉलीस्टिरीन उत्पादनांवर पूर्ण बंदी घालणारे हे एकमेव राज्य आहे.

🔰स म्हणजे नवे व किम म्हणजे राजवाडा या दोन नावांचा संगम म्हणजे सिक्कीम.

🔰 तिबेटी भाषेत या राज्याला तांदूळ पिकवणारी दरी असे म्हटले जाते.

🔰लपचा लोक येथील मूळ रहिवासी. याशिवाय लिम्बू व मागर जनजातीचे लोक येथे राहतात.

🔰कमी लोकसंख्या व छोटे क्षेत्रफळ असूनही हे हिमालयाच्या कुशीतील राज्यांत सर्वात श्रीमंत राज्य आहे.

🔰ह राज्य वनसमृद्ध असल्याने लाल पांडा, तिबेटी कोल्हा, ठिपकेधारी बिबट्या, हिमालयीन मांजर हे प्राणी व सोनेरी गरूड, चमच्या, दयाळ हे पक्षी येथे आढळतात.

No comments:

Post a Comment