लॅक्टोज अपचन काय आहे
आवडत्या आईस्क्रीमवर किंवा चीजवर ताव मारून जवळजवळ एक तास होत आला आहे.
तुमचे पोट फुगल्यासारखे तुम्हाला वाटते; तुम्हाला अस्वस्थ वाटते आणि पोटात गॅस झाला आहे.
तुम्ही लगेच, नेहमी जवळ बाळगण्यास सुरवात केलेली गोळी घेता आणि तुम्हाला बरे वाटू लागते.
तुमच्या मनात असा प्रश्न येतो: ‘माझं पोट इतकं नाजूक का आहे?’
दुध प्यायल्यावर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यावर तुम्हाला मळमळ होत असेल, पोटात कळा मारत असतील, पोट गच्च भरल्यासारखे वाटत असेल, गॅस होत असेल किंवा वारंवार शौचास होत असेल तर कदाचित तुम्हाला लॅक्टोज अपचनाचा त्रास असेल.
लॅक्टोज अपचनाचा त्रास बहुधा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर होतो.
मधुमेह, पचनक्रिया व मूत्रपिंडासंबंधित रोगांची राष्ट्रीय संस्था असा अहवाल देते, की “३ ते ५ कोटी अमेरिकनांना लॅक्टोज अपचनाचा त्रास आहे.”
हावर्ड मेडिकल स्कूलने प्रकाशित केलेल्या,
संवेदनक्षम आतडे (इंग्रजी) नावाच्या पुस्तकानुसार, “जगाच्या लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकांना लॅक्टोजचा काही ना काही तरी त्रास होतो”
असा अंदाज लावला जातो. लॅक्टोज अपचन आहे तरी काय?
लॅक्टोज अपचन किती गंभीर?
एका स्त्रीला दीर्घकाळापासून गॅसचा आणि पोटात कळा मारण्याचा त्रास होता.
तिचा आजार इतका विकोपाला गेला की ती वैद्यकीय उपचार घेण्यासाठी गेली.
अनेक चाचण्यांनंतर, तिला (आयबीडी) आतड्यांना दाह असल्याचे निदान करण्यात आले.
* या विकृतीला आटोक्यात ठेवण्यासाठी तिला औषधे देण्यात आली.
परंतु तिने दुग्धजन्य पदार्थ खाण्याची आपली रोजची सवय सोडली नव्हती; त्यामुळे तिच्या विकृतीची लक्षणे औषध घेऊनही दिसत होती.
मग तिने स्वतःच परीक्षण केल्यावर तिला समजून आले, की कदाचित ती जे अन्न खात होती त्यामुळे तिला त्रास होत असावा; यासाठी ती एक एक करून विशिष्ट अन्नपदार्थ खाण्याचे टाळू लागली
. कालांतराने, तिने दुधापासून बनलेले पदार्थ खाण्याचे सोडून दिले तेव्हा तिच्या आजाराची लक्षणेही गायब होऊ लागली! एका वर्षात—तिने आणखी चाचण्या केल्यानंतर—तिच्या डॉक्टरांनी तिला आयबीडीचा आजार नव्हता असे सांगितले.
तिला लॅक्टोज अपचनाचा आजार होता. तिला किती आराम मिळाला असावा याची तुम्ही कल्पना करू शकता!
पुढील गोष्टींमध्ये देखील लॅक्टोज असू शकते:
▪️ बरेड आणि ब्रेडचे पदार्थ
▪️ कक आणि कुकीज
▪️ चॉकलेट आणि गोळ्या
▪️ इन्स्टंट पटेटो (बटाट्याची तयार पूड)
▪️ मार्जरीन (प्राण्याच्या किंवा वनस्पतीच्या चरबीतून बनवलेले तूप)
▪️ अनेक लिहून दिलेली औषधे
▪️ लिहून न दिलेली परंतु औषधांच्या दुकानात मिळणारी औषधे
▪️ पनकेक, बिस्किटे, कुकीज बनवण्यासाठी असलेले तयार पीठ
▪️ परक्रिया केलेली नाश्त्याच्या वेळी खाल्ली जाणारी सिरियल्स
▪️ सलाड सॉस किंवा रस
▪️ गोठवलेले मांस
▪️ सप
No comments:
Post a Comment