१७ ऑगस्ट २०२०

विज्ञान :- शरीरात हिमोग्लोबिन वाढवायचे कसे ?



मानवी शरीरात रक्तातील लाल पेशींमध्ये असणारे हिमोग्लोबिन रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक असते. म्हणजेच हिमोग्लोबिन कमी झाले की, शरारीतील रक्ताचा पुरवठा देखील योग्य रित्या होत नाही. असे होऊ नये म्हणून अशा वेळी डॉक्टरच आपल्याला काय खावे? खाऊ नये? याबाबत सांगतात. त्यावर एक नजर...

1. *बीट* : याच्या सेवनाने व्हिटॅमिन सी आणि लोह अशा दोन्ही गोष्टी  मिळतात. याने शरीरातील रक्ताचे प्रमाण देखील वाढत वाढते.

2. *पालक* : यामध्ये मोठ्या प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. याने शरीरातील हिमोग्लोबिन चांगलेच वाढू शकते.

3. *अंडी* : यामुळे शरीराला लोह मिळते तसेच अनेक पोषक घटक यात असतात.

4. *सुकामेवा* : सुकामेव्यातील अंजीर, जर्दाळू , बदाम, काळ्या मनुका, खारीक अशा अनेक ड्रायफ्रुट्समधून लोह मिळते.

5. *मासे* : कोळंबी, सुरमई, बांगडा असे मासे आहारातून जरूर खा. ज्यामुळे शरीराला मुबलक लोह मिळते.

6. *डाळिंब* : यामध्ये लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात.

ज्या लोकांना आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवायचे आहे त्यांनी आहारात वरील पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण वाढवायला हवे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...