Thursday, 20 August 2020

वेदिक वाड्मयाची रचना



◾️ आर्य लोक निसर्गप्रेमी आणि अनेक देव-देवतांचे पूजक होते.

◾️ सर्य, अग्नी, पर्जन्य, मरुत आणि इंद्र या त्यांच्या प्रमुख देवता होत्या. या देवतांना प्रत्यांना प्रसन्न करण्यासाठी ते प्रार्थना करीत व स्तुति करण्याकरीता मंत्र म्हणीत असे.

◾️ या मंत्राना सूक्त म्हणतात या मंत्राचा समूह म्हणजे वेद होय. यामधून आर्यांनी खालील ग्रथसंपदेची रचना केली.

◾️ वद : आर्यानी निर्माण केलेली पहिली ग्रंथरचना म्हणजे वेद होय. वेद चार प्रकारचे आहेत.

1) ऋवेद : हा आर्यांचा पहिला ग्रंथ असून यामध्ये देवतांना प्रसन्न करण्याकरीता रचलेल्या ऋचांचा समावेश आहे.

2) यजुर्वेद : हा ग्रंथ यज्ञाविषयी माहिती देणारा आहे.

3) सामवेद : या ग्रंथामध्ये ऋचांचे तालासुरात कसे गायन करावे याबाबतची माहिती आहे.

4) अर्थवेद : या ग्रंथामध्ये दैनंदिन जीवनातील संकटे निवारण करण्याकरीता आणि उत्तम आरोग्य कराव्या लागणार्‍या उपायाची माहिती आहे.

No comments:

Post a Comment