Wednesday 5 August 2020

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत? फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती.

🔰चांद्रयान-२ मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना झालेल्या ‘विक्रम लँडर’चा चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. . जवळपास १० महिन्यांनंतर आता त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

🔰गेल्या वर्षी ‘नासा’च्या फोटोंचा वापर करुन विक्रमचा ढिगारा(डेब्रिस) ओळखणारे चेन्नईचे इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी इस्त्रोला एक ईमेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे.

🔰भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला पाठवलेल्या ई-मेलमध्ये शनमुग सुब्रमण्यन यांनी ‘नासा’ने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरुन प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाले असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, यावर इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

🔰टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी, “आम्हाला याबाबत अजून नासाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण, ज्या व्यक्तीने विक्रमचा ढिगारा ओळखला होता, त्याने आम्हाला याबाबत ई-मेल केला आहे. आमचे तज्ज्ञ त्यावर अभ्यास करत आहेत, पण आताच याबाबत काहीही सांगता येणार नाही”,अशी माहिती दिली आहे.

No comments:

Post a Comment