Sunday 16 August 2020

‘सार्थक’: भारतीय तटरक्षक दलाचे चौथे गस्ती जहाज



13 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय तटरक्षक दलाच्या ‘सार्थक’ नामक गस्ती जहाजाचे जलावतरण करण्यात आले.

🔴जहाजाची वैशिष्ट्ये आणि इतर ठळक बाबी

🔸तटरक्षक दलासाठी बनविण्यात येणाऱ्या पाच गस्ती जहाजांच्या मालिकेतले हे चौथे गस्ती जहाज आहे.

🔸गोवा शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक कंपनीने या जहाजाची रचना आणि बांधणी स्वदेशी तंत्रज्ञानाने केली आहे.

🔸जहाजात अत्याधुनिक अशी नौकानयन आणि संचार साधने, संवेदक आणि यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत.

🔸105 मीटर लांबी असलेल्या या जहाजाचे वजन 2350 टन असून जहाजाला 9100 किलोवॅटची दोन इंजिन आहेत, ज्या माध्यमातून 6000 नॉटीकल मैलांपर्यत 26 नॉटस गति प्राप्त केली जाऊ शकते.

🔸शोध आणि तपास कार्यासाठी ट्वीन-इंजिन हेलिकॉप्टर, चार हायस्पीड बोट आणि एक शिडाचे जहाज वाहून नेण्याची क्षमता या जहाजामध्ये आहे. समुद्रातल्या तेल गळतीमुळे होणाऱ्या प्रदुषणाला रोखण्यासाठी नियंत्रण प्रदुषण प्रतिसाद साधने वाहण्याची जहाजाची क्षमता आहे.

🔸भारतीय तटरक्षक दल वर्षभर कार्यरत राहणारे स्वदेशी तंत्रज्ञान सामील करुन घेण्यात आघाडीवर आहे. सार्थक जहाजात 70 टक्के स्वदेशी तंत्रज्ञान आहे, यामुळे जहाजबांधणी उद्योगाला चालना मिळाली असून ‘आत्मनिर्भर भारताच्या’ दिशेने मोठी झेप घेतली गेली आहे. हे जहाज विशेष आर्थिक क्षेत्राची गस्त, सागरी सुरक्षा आणि भारतीय तटरक्षक दलाच्या राष्ट्रहितासंबंधीच्या इतर कर्तव्यांची पूर्ती करणार.

भारतीय तटरक्षक दलाविषयी

🔸भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलानंतर तटरक्षक दल सर्वात छोटे सशस्त्र सैन्यदल आहे. दिनांक 18 ऑगस्ट 1978 रोजी भारतीय तटरक्षक दलाची स्थापना झाली.

🔸सागरी आर्थिक क्षेत्रांची सुरक्षा, किनारी सुरक्षा, समुद्री सुरक्षा, समुद्री पर्यावरण संरक्षण या भारतीय तटरक्षक दलाच्या जबाबदार्‍या आहेत. दलाकडून अवैध कारवाया, दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्र व्यापार, अवैध मानवी व्यापार मासेमारी, तस्करी, अंमली पदार्थांचा व्यापार इत्यादी रोखण्यासाठी कार्यवाही केली जाते.

No comments:

Post a Comment