Wednesday, 12 August 2020

ग्लोबल वॉर्मिंगचा वेग भविष्यात वाढणार

वातावरणातील कार्बन डायऑक्साइडची पातळी ज्या प्रमाणात वाढत आहे, त्या प्रमाणात जागतिक तापमानातही वाढ होत असल्याचे निरीक्षण एका अभ्यासातून मांडण्यात आले आहे. यासाठी ५० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या तप्त वातावरणाची तुलना करण्यात आली आहे. काही नाही वाढणार, आजकाल लोकं एवढी झाडे लावतायेत की वातावरण सद्य परिस्थिती पेक्षा शुद्ध होईल.
सुमारे ४८ दशलक्ष ते ५६ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या काळाला 'अर्ली ओसीन' काळ म्हटले जात असून या कालावधीत जगभरात गेल्या ६६ दशलक्ष वर्षांतील सर्वाधिक तापमान होते, असे मानले जाते. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठ आणि अॅरिझोना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या 'अर्ली ओसिन' कालावधीचा अभ्यास करून हे मत मांडले आहे.

वातावरणातील कार्बन डायऑक्साइड ज्या प्रमाणात वाढत आहे, त्याचा परिणाम वातावरणावर होत असल्याबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. भविष्यात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जसे वाढेल, त्यानुसार तापमानवाढीचा वेगही आतापेक्षा अधिक वाढणार आहे आणि ही नक्कीच आपल्यासाठी चांगली बातमी नाही, अशा शब्दांत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांनी याआधी 'अर्ली ओसीन' या काळातील कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाशी याआधीही तुलना केली होती, मात्र तेव्हा त्यांना अशी चिंताजनक तापमानवाढ आढळली नव्हती. त्यांनी वातावरणअभ्यासाच्या तंत्रामध्ये बदल करून त्यात ढगांचे प्रमाण तपासण्याची पद्धत अवलंबल्यानंतर शास्त्रज्ञांना हा बदल आढळून आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या वातावरणातील ढगांचे प्रकार आणि त्यांच्या प्रमाणामध्ये बदल होतात आणि ढगांमुळे वातावरणावर उष्ण आणि शीत परिणाम होतात.

ढगांचा वातावरणातील बदलावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला असता, भविष्यात वातावरणातील बदल वाढून तापमानवाढ होणार असल्याचे मत शास्त्रज्ञांनी मांडले. भूगर्भशास्त्रीय पुराव्यानुसार 'अर्ली ओसीन' काळात कार्बन डायऑक्साइडची पातळी प्रती एक दशलक्षमागे एक हजार होती (पीपीएम), ही पातळी सध्याच्या स्थितीत ४१२ आहे. कार्बन उत्सर्जनावर निर्बंध न आणल्यास ही पातळी सन २१०० पर्यंत १०००वर पोहोचेल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...