Sunday, 16 August 2020

मंगलप्रभात लोढा: देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक



- भाजपाचे आमदार, मुंबई भाजपाचे अध्यक्ष  आणि बांधकाम व्यावसायिक मंगलप्रभात लोढा हे देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत.
- लोढा यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ३१ हजार ९३० कोटी रूपये इतके झाले आहे.
- हुरुन रिपोर्ट आणि ग्रोही इंडियाने सोमवारी ‘ग्रोही हुरुन इंडिया रीयल एस्टेट रिच लिस्ट २०१९" जारी केली. या यादीमध्ये लोढा यांना पहिलं स्थान देण्यात आलं आहे. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये लोढा यांनाच पहिलं स्थान देण्यात आलं होतं.
- लोढा यांच्यानंतर डिएलएफचे उपाध्यक्ष राजीव सिंग यांना दुसरं स्थान देण्यात आलं आहे. २५ हजार ८० कोटी रूपयांच्या वार्षिक उत्पन्नासहित ते दुसऱ्या स्थानावर आहेत. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीत त्यांना तिसरं स्थान देण्यात आलं होतं.
- एम्बेसी समुहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र विरवानी यांना या यादीत तिसरं स्थान देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे २४ हजार ७५० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्न आहे.
- निरंजन हिरानंदानी यांना १७ हजार ३० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्नासह चौथं, चंदू रहेजा यांना १५ हजार ४८० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्नासह पाचवं आणि विकास ओबेरॉय यांना १३ हजार ९१० कोटी रूपयांच्या एकूण उत्पन्नासह सहावं स्थान देण्यात आलं आहे.
- बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशातील १०० मोठ्या व्यावसायिकांचं एकूण उत्पन्न २ लाख ७७ हजार कोटी रूपये इतकं आहे. या वर्षी बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या ६ कंपन्यांनी २ हजार कोटी रूपयांची तर अन्य २० कंपन्यांची १ हजार कोटी रूपयांची विक्री केली.
- लोढा कुटुंबीयांचे ३१ मार्चपर्यंत एकूण ४० प्रकल्प सुरू होते. गेल्या वर्षभरात लोढा कुटुंबीयांच्या एकूण उत्पन्नात १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर राजीव सिंग याच्या एकूण उत्पन्नात गेल्या वर्षभरात तब्बल ४२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

Eklavya

विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...