Thursday 20 August 2020

स्वर्गीय सूर हरपला - पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन.



🔰पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन झाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. न्यू जर्सी येथे त्यांचं निधन झालं. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित जसराज भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते. भारत सरकारने २००० मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते. पंडित जसराज हे मूळचे तबलजी होते.

🔰गायकाच्या तुलनेत इतर साथीदारांना दुय्यम समजले जाते हे समजल्याने त्यांनी तबला वादन सोडून गायक बनायचे ठरवले. त्यांचे मोठे बंधू मणिरामजी यांनी त्यांना गाणे शिकवले. भारतीय संगीतातला एक स्वर्गीय सूर हरपला अशीच भावना संगीत रसिकांच्या मनात आहे.

🔰पडित जसराज यांचा जन्म २८ जानेवारी १९३० रोजी झाला होता. पंडित जसराज हे गेल्या ८० वर्षांपासून जास्त काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते. संगीत क्षेत्रातल्या अनेक प्रमुख पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. मेवाती घराण्यातील गायकी असलेल्या पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय संगीत गायन क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment