Wednesday 12 August 2020

पाण्याचे असंगत आचरण :

· सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.

· परंतु पाण्याचे तापमान 40C पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.

· 00 C तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 40C तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.

· 40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 40C च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.

· पाण्याचे 00C पासून 40C पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.

· 40C या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 40C ला उच्चतम (Maximum) असते.

· पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.

· बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 00C तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.

· थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 00C पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 40C होईपर्यंत चालू राहते.

तापमान 40C पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते. परिणामी त्याची घनता कमी होऊन ते पृष्ठभागावरच राहते.

पृष्ठभावरील तापमान कमी होत होत 00C तापमानास त्याचे बर्फ होते. बर्फाखालील पाण्याचे तापमान 40C च राहाते.

· बर्फ उष्णतेचा विसंवाहक (Bad Conductor) आहे. त्यामुळे बर्फाखालील पाण्याची उष्णता वाटवरणात जाऊ शकत नाही.

· अशाप्रकारे 40C तापमानास जलीय वनस्पति व जलचर प्राणी जीवंत राहू शकतात.

· तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास नळातील पाणी आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावते. 00C तापमानाला पाण्याचे बर्फ होते. नळाच्या आतील बाजूवर मोठा दाब निर्माण होऊन नळ फुटतात.

· कधीकधी खडकाच्या फटीमध्ये पाणी शिरते आणि तापमान 40C पेक्षा कमी झाल्यास पाणी प्रसरण पावते. मोठा दाब निर्माण होऊन खडक फुटून त्याचे तुकडे होतात.

No comments:

Post a Comment