प्राण्यांच्या चेतासंस्थेतील पेशी. या विद्युत स्वरूपात माहिती साठवून ठेवतात, ती इकडून तिकडे पाठवतात व माहितीवर प्रक्रियासुद्धा करतात.
एका सर्वसाधारण चेतापेशीचे तीन अवयव असतात मुख्य शरीर (सोमा),चेतातंतू आणि चेताक्ष. चेतापेशीचा विकास होत असतानाच्या अवस्थेमध्ये चेतातंतू आणि चेताक्ष, हे वेगवेगळे दाखवता येत नाहीत त्या अवस्थेमध्ये त्यांना एकत्रितपणे "चेतागर्भ" असे म्हणतात. चेतातंतू हे नावाप्रमाणेच तंतूमय असतात आणि ते चेतापेशीच्या मुख्य शरीराला जोडलेले असतात. त्यांची लांबी शेकडो मायक्रोमिटर एवढी असू शकते. चेतातंतू हे एकसलग नसतात, त्यांचे अनेक ठिकाणी विभाजन झालेले असते, अशा विभाजनामुळे त्यांचा आकार एखाद्या वृक्षासारखा दिसतो. चेताक्ष हा चेतापेशीच्या मुख्य शरीराला जोडलेला दंडगोलाकार भाग असतो. मुख्य शरीर आणि चेताक्षाच्या जोडणीच्या जागेला चेताधार म्हणतात. चेताक्षाची लांबी मनुष्यामध्ये जास्तीत-जास्त १ मीटर एवढी असू शकते (इतर काही प्राण्यांमध्ये याहीपेक्षा लांब चेताक्ष सापडतात). चेतापेशीच्या मुख्य शरीराला अनेक चेतातंतू जोडलेले असतात, परंतू चेताक्ष एकच असतो. अर्थात या एकाच चेताक्षाच्या शेकडो शाखा असू शकतात. एका चेतापेशीच्या दुसरीशी असलेल्या विद्युत जोडणीला "चेतन बिंदू" असे म्हणतात. चेतापेशींमधील संदेशवहन चेतन बिंदू मार्फत होते, सहसा एका चेतापेशीच्या चेताक्षातून दुसरीच्या चेतातंतू मध्ये हे संदेश पाठवले जातात. अर्थात या नियमाला काही अपवाद आहेत, उदाहरणार्थ काही चेतापेशींमध्ये चेतातंतू नसतात तसेच काहींमध्ये चेताक्ष नसतो, अशा परिस्थिती मध्ये "चेताक्ष ते चेताक्ष" किंवा "चेतातंतू ते चेतातंतू" अशी जोडणी असू शकते.
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
चेतासंस्था या नावाचा उगम चेता पासून आहे. चेता म्हणजे दंडगोलाकार तंतूंचा जुडगा. हा जुडगा मेंदू आणि मज्जारज्जूमधील दुवा आहे. चेता
विभाजित होऊन शरिराच्या प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचते. इजिप्शियन, ग्रीक, आणि रोमन संशोधकानी चेता प्रत्यक्ष पाहिलेल्या होत्या. त्यातील सूक्ष्म रचना त्याना ठाऊक नव्हती. सूक्ष्मदर्शकाचा शोध लागल्यानंतर चेता अनेक तंतूनी बनलेली असते हे समजले. हे तंतू चेतापेशींच्या अक्षतंतूंचे होते. अक्षतंतूभोवती गुंडाळलेली पटले आणि पटलामध्ये अधून मधून खंड (फॅसिकल) असतात हे सूक्ष्मदर्शकाखाली दिसत असे. अक्षतंतूंचा उगम पेशीपासून होतो. पण बहुतांश पेशी मेंदू, मज्जारज्जू आणि गुच्छिकेमध्ये स्थित आहेत. मध्यवर्ती चेतासंस्था हा चेतासंस्थेमधील सर्वात मोठा भाग आहे. मेंदू आणि मज्जारज्जू असे त्याचे ढोबळ दोन भाग करता येतात. पाठीच्या कण्यातील मज्जा पोकळीमध्ये मज्जारजू असतो. मेंदू मात्र कवटीमध्ये असतो, मध्यवर्ती मज्जासंस्थेवर तीन आवरणे असतात. त्याना मस्तिष्क पटल असे म्हणतात. चर्ममय बाह्य चिवट आवरणास दृढावरण असे म्हणतात. मेंदूचे संरक्षण कवटीमुळे आणि मज्जारज्जूचे मणक्यामुळे होते.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चेतापेशी :
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
चेतापेशी इतर पेशीपासून सहज वेगळ्या ओळखता येतात. त्या परस्परांशी अनुबंधाद्वारे जोडलेल्या असतात. चेतापेशीमधील अनुबंध म्हणजे एका पेशीच्या पेशीपटलामधून दुसऱ्या पेशीमधील पटलामध्ये त्वरित होणारे संदेश वहन. हे वहन रासायनिक किंवा विद्युत भाराच्या स्वरूपात असते. बहुतेक चेतापेशीना एक किंवा अनेक प्रवर्ध (पेशीपासून निघालेला लांब भाग) निघतात. सर्वात लांब प्रवर्धास अक्षतंतू असे म्हणतात. हा प्रवर्ध शरीरामध्ये लांबपर्यंत विस्तारलेला असतो. अक्षतंतू प्रवर्ध इतर हजारो पेशीशी अनुबंधाने जोडलेले असतात. अनेक अक्षतंतू एकत्र येऊन बनलेली चेता(नर्व्ह)च्या स्वरूपात शरीरभर स्नायू किंवा अवयवापर्यंत गेलेली असते.
मानवी चेतासंस्थेमध्ये शेकडो प्रकारच्या चेतापेशी असतात. प्रत्येक पेशीची रचना आणि कार्यांमध्ये विविधता आहे. यांमधील संवेदी चेतापेशी प्रकाश व ध्वनि संवेदना ग्रहण करतात. प्रेरकचेतापेशी स्नायू आणि ग्रंथीना संदेशाद्वारे उत्तेजित करतात. बऱ्याच प्राण्यांमध्ये बहुतेक संवेदी चेतापेशी संदेश ग्रहण करून ते संदेश इतर चेतापेशीकडे पाठवतात.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
सहयोगी पेशी:
▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️
सहयोगी पेशीमध्ये चेतापेशीचे एकही कार्य होत नाही. सहयोगी पेशी चेतापेशीना आधार देतात, अंतर्गत स्थिरता आणतात आणि संदेश वहन प्रक्रियेमध्ये मदत करतात. चेतापेशीच्या अक्षतंतूवर असणारे मायलिन आवरण सहयोगीपेशीपासून बनलेले आहे. एका अंदाजानुसार मानवी मेंदूमध्ये एकूण सहयोगी पेशींची संख्या चेपापेशींइतकी असावी. त्यांची संख्या मेंदूच्या विविध भागात आवश्यकतेनुसार कमी अधिक आहे. सहयोगी पेशींचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे चेतापेशीना आधार देणे, त्यांचे पोषण करणे, विद्युतरोधी आवरण, परजीवींचा नाश आणि मृत चेतापेशी नष्ट करणे, वगैरे.. अक्षतंतूंच्या मार्गिकेचे कार्य केल्याने अक्षतंतू विविक्षित भागापर्यंत सुलभपणे पोहोचतात. मध्यवर्ती चेतासंस्थेतील ऑलिगोडेंड्राइट आणि परीघवर्ती चेतासंस्थेतील श्वान पेशींच्या मेद पटलाचे आवरण अक्षतंतूभोवती गुंडाळलेले असते. या आवरणास मायलिन असे म्हणतात. अक्षतंतूमधून होणारे विद्युत रासायनिक संवेद वहन सुरळीत व्हावे यासाठी मायलिन हे विद्युत विरोधी आवरण कार्य करते. काहीं आजारात मायलिन आवरण नष्ट झाल्यास अक्षतंतूमधून येणाऱ्या आणि जाणाऱ्या संवेदामध्ये गंभीर परिणाम होतात. कशेरुकी(पृष्ठवंशी) प्राण्यामधील चेतासंस्था कशेरुकी सजीवांमधील चेतासंस्थेचे दोन भाग होतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि परीघवर्ती चेता संस्था.
▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️▪️♦️
मध्यवर्ती चेतासंस्था
परीघवर्ती चेतासंस्था
▪️▪️▪️🔺🔺🔺▪️▪️▪️🔺🔺🔺
परीघवर्ती मज्जासंस्था हे समुदायवाचक नाव आहे. ही मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या बाहेर असते. अक्षतंतूंच्या जुडग्याना चेता असे म्हणतात. चेता हा परीघवर्ती मज्जासंस्थेचा भाग आहे. परीधवर्ती संस्थेचे दोन भाग आहेत. कायिक (सोमॅटिक) आणि आंतरांगिक (व्हिसरल) . कायिक भागामधील चेता त्वचा, सांधे, आणि स्नायू यांच्यापर्यंत गेलेल्या असतात. कायिक संवेदी चेतापेशी मेरुरज्जूमधून निघणाऱ्या मेरुचेतामधील अधर बाजूस असलेल्या गुच्छ्तिकेमध्ये असतात. आंतरांगिक भागापासून रक्तवाहिन्या, आणि उदरपोकळीमधील ग्रंथी पर्यंत चेता गेलेल्या असतात. आंतरांगिक चेता संस्थेचे आणखी दोन सिंपथॅटिक (अनुकंपी तंत्रिका तंत्र) आणि पॅरासिंपथॅटिक असे आणखी दोन भाग असतात. कशेरुकी – पृष्ठवंशी प्राण्यांची चेता संस्था करड्या आणि श्वेत भागामध्ये विभागली जाते. जरी करड्या भागास ‘ग्रे मॅटर’ असे संबोधले जात असले तरी हा करडा रंग फोर्मॅलिनच्या द्रावणात ठेवलेल्या मेंदूचा आहे. प्रत्यक्षात जीवित मेंदूच्या छेदाचा बाह्य भाग गुलाबी किंवा फिकट तपकिरी दिसतो. या भागात चेतापेशीमधील पेशीकाय मोठ्या प्रमाणात असतात. श्वेत भागात मायलिन अक्षतंतूचे प्रामाण अधिक असते. मायलिन आवरणामुळे या भागास श्वेत रंग येतो. श्वेत भागात परिघवर्ती चेता, मेंदूचा अंतर्गत भाग आणि मेरुरज्जूचा अंतर्गत भाग असतो. मेंदू आणि मेरुरज्जूच्या करड्या भागात चेतापेशींचे समूह असतात. मेंदूच्या बाह्यक करडे तर अंतर्भाग श्वेत रंगाचा असतो. शरीरशास्त्राच्या सोयीसाठी चेतापेशींच्या मेंदूतील समूहास ‘केंद्रक’ (न्यूक्लियस) म्हणण्याची पद्धत आहे. मध्यवर्ती चेतासंस्थेबाह्य पेशीसमूहास गुच्छिका म्हणतात. या नियमास काहीं अपवाद केले आहेत.
🔺🔺🔺▪️▪️▪️🔺🔺🔺🔺▪️▪️
प्रतिक्षेपी क्रिया
सर्वात चेतनी परिपथ म्हणजे प्रतिक्षेप चाप किंवा प्रतिक्षेप कमान. या परिपथामध्ये संवेदी चेतापेशी पासून आवेग सुरू होतो आणि प्रेरक चेतापेशीद्वारे स्नायूमध्ये किंवा ग्रंथीमध्ये संपतो. अगदी सोपे प्रतिक्षेपी चापाचे उदाहरण म्हणजे स्वयंपाक करताना बसलेला तव्याचा चटका. चटका बसणे आणि त्वरित हात भाजणाऱ्या वस्तूपासून लांब जाणे प्रतिक्षेपी चापाद्वारे होते. चापाचा प्रारंभ संवेदी चेतापेशीद्वारे सुरू होतो. त्वचेमध्ये संवेदी चेतापेशींची असंख्य टोके आहेत. त्यामध्ये दाब, वेदना, उष्णता, थंडी असे विविध संवेद चेतापेशीद्वारे मध्यवर्ती चेतासंस्थेकडे नेले जातात. उष्णतेमुळे चेतामध्ये आवेग उत्पन्न होण्यासाठी ठरावीक क्षमतेचा संवेद असावा लागतो. अक्षतंतूमध्ये कोणताही संवेद निर्माण होत नाही या स्थितीस स्थिर स्थिति (रेस्टिंग पोटेंशियल) म्हणतात. अशा स्थिर स्थितेमध्ये अक्षतंतूच्या बाहेर घन आयनांची संख्या अधिक आणि ऋण आयनांची संख्या अक्षतंतूमध्ये अधिक असते. अक्षतंतूची विद्युत स्थिति अशावेळी ऋण ७० मिलिव्होल्ट एवढी असते. (-७० मिलिव्होल्ट) स्थिर स्थिति भार राखण्यासाठी अक्षतंतूच्या पटलामधून सोडियमचे आयन पेशीबाहेर वा पोटॅशियम आयन पेशीमध्ये आयन चॅनल मधून येतात वा जातात. पेशीतील अंतर्भाग संवेद वहन होत नाही अशा वेळेस ऋण70 मिलिव्होल्ट असण्याचे कारण म्हणजे पेशीमधील प्रथिने. प्रथिनांचा आयन भार ऋण असतो. सर्व ऋण आयन भार संतुलित करतील एवढे घन आयन पेशीमध्ये कधीही नसतात.
संवेद उत्पन्न होण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोडियम आयन पेशीमध्ये आणि पोटॅशियम आयन बाहेर जाण्याची गरज असते. कोणताही संवेद आला म्हणजे नेहमीचे सोडियम पोटॅशियम आयनांचे पेशीमधील प्रमाण बदलते. आतील आयन भार -७० मिलिव्होल्ट वरून +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे अक्षतंतू उत्तेजित झाला असे म्ह्णण्याची पद्धत आहे. +मिलिव्होट हे “क्रिया आयन भार” “ॲ क्शन पोटेंन्शियल” आहे. एकदा क्रिया आयन भार +३५ मिलिव्होल्ट झाला म्हणजे त्याचे अक्षतंतूच्या ध्रुवतेनुसार वहन होते. संवेदी अक्षतंतू संवेद मध्यवर्ती चेतासंस्थेकडे तर प्रेरक अक्षतंतूतर्फे योग्य त्या अवयवाकडे, स्नायूकडे किंवा ग्रंथीकडे पाठविला जातो.
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
No comments:
Post a Comment