Tuesday, 18 August 2020

एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्यास मुभा.



🔰एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांना केंद्र बदलण्यास मुभा देण्याच्या निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. पुणे महसूली विभागाच्या बाहेरच्या ज्या उमेदवारांनी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडले आहे, त्यांना केंद्र बदलण्याची मुभा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

🔰काही दिवसांपूर्वी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी सुरक्षिततेच्या कारणास्तव ही परीक्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता ही परीक्षा २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, आता एमपीएसचीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी केंद्र बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.

🔰कद्र बदलणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या महसुली विभागाच्या मुख्यालयाचे केंद्र निवडता येईल. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या सुरक्षिततेचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आयोगाने परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर केंद्र बदलण्याची परवानगी देण्याची मागणी उमेदवारांसह लोकप्रतिनिधी करण्यात येत होती.

No comments:

Post a Comment