Saturday, 18 June 2022

वनस्पतीचे वर्गीकरण :

उपसृष्टी : 1 अबीजपत्री - अपुष्प वनस्पती

विभाग - 1 : थॅलोफायटा

· शरीर साधे , मऊ ,तंतुमय

· मूळ , खोड , पान, नसते.

· पाण्यात आढळतात .

· स्वयंपोषी असतात.

· लैगिक जननांग - युग्माकधानी

वर्ग - 1 : शैवाल

· वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी

· उदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा

· प्रकाश स्वयंपोषी

वर्ग - 2 : कवक

· परपोशी पोषण पद्धती

· इतरांच्या शरीरात, शरीरावर किंवा मृतोपाजीवी असतात.

· शरीर तंतुजालरूपी असते.

· तंतुरूपी कवकाना बुरशी म्हणतात.

· उदा. पेनिसिलीयम , म्युकर

· जननांगे मोठी आणि छत्रिसारखी असणाऱ्यांना 'छत्रकवके' म्हणतात.

· उदा . अगॅरिकस

· एकपेशीय कवकाना 'किन्व' म्हणतात .

· उदा . सॅकरोमायसिस

शैवाक -

· शैवाल व कवक एकत्र वाढ

· परस्परपूरक सहजीवन

· उदा . उस्निया (दगडफूल)

जीवाणू -

· एकपेशीय आदिकेंद्रकी सजीव.

· निरनिराळ्या पोषण पद्धती.

· प्रजजन साध्या स्वरूपाचे.

विभाग -२ : ब्रायोफायटा

· निम्नस्तरीय, बहुपेशीय, स्वयंपोषी, सावलीत राहण्याऱ्या उभयचर वनस्पती आहेत.

· बीजाणू निर्मितीचे प्रजनन करतात.

· शरीर चपटे , रीबिनसारखे व मऊ.

· मुळासारखे दिसणारे मुलाभ असतात.

· उदा. मॉस, रिक्सिया , मार्केंशिया , अॅन्थॉसिरॉस, फ्युनारीया

विभाग -3 : टेरीडोफायटा

· पाणी व खनिज वहनासाठी सुस्पष्ट संवहनी संस्था असते.

· मूळ, खोड, पाने असतात.

· सहसा लहान पर्णिका असतात.

· सावलीत व दमट वातावरणात वाढतात.

· अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे होते.

· 3 उपवर्गात विभाजन होते.

वर्ग -1 : लायाकोपोडीनी

· या वनस्पती नेच्यासारख्या असतात.

· उदा. लायाकोपोडीयम, सीलॅजीनेला

वर्ग -2 : इक्वीसेटीनी

· नेच्यासारख्याच असतात.

· बिजानुधानीच्या समूहास शंकू म्हणतात.

· उदा. इक्वीसेटम

वर्ग -3 : फिलीसिनी

· वनस्पतीचा सर्वात मोठा वर्ग आहे.

· या वनस्पतींना 'नेचे' म्हणतात.

· बिजानुधानीपुंज पानावर तयार होतात.

· उदा. नेफ्रोलीपीस, अॅडीएन्टम, किलॅन्थेस, टेरिस

उपसृष्टी : 2 बिजपत्री - सपुष्प वनस्पती

विभाग -1 : अनावृत्तबीजी वनस्पती

· यांना उच्चकुलीन वनस्पती असे म्हणतात.

· या वनस्पतीच्या बिजांवर आवरण नसते. त्यांची मोठया आकाराची बीजे बृहद्बीजाणू पत्रांवर तयार होतात.

· काही वृक्ष मोठे व पुरातन असतात.

· उदा . सायकस, सूचीपर्णी (पायनस), देवदार (सेडस)

· सदाहरित, बहुवार्षिक

· खोडाला फांद्या नसतात.

· नर व मादी फुले वेगवेगळया बिजानुपत्रावर येतात.

· फळे येत नाहीत.

विभाग -2 : आवृत्तबिजी वनस्पती

· या वनस्पतीची बीजे संरक्षक आवरणात असतात.

· फुले हीच प्रजननांगे असतात.

· अतिसूक्ष्म जलीय वनस्पती वुल्फिया टे प्रचंड आकाराच्या ऑस्ट्रेलीयन अकॅशिया किंवा युकॅलिप्टस् यांचा समावेश होतो.

· 2 वर्गात विभागणी होते.

वर्ग -1 व्दिबिजपत्री वनस्पती

· बियांच्या भ्रुनात दोन बिजपत्रे असतात.

· मूळ हे सोटमूळ प्रकारचे असते.

· पानाचा शिराविण्यास जालीकीय असतो.

· उदा. सुर्यफुल, सदाफुली, जास्वंद, लिंबू ,पेरू, आंबा, वाटणा, वाल, हरभरा, टोमॅटो, मिरची, वांगी ,कोथिंबीर, कापूस,तुळस

वर्ग -2 एकबिजपत्री वनस्पती :

· बियांच्या भृणात फक्त एकच बिजपत्र असते.

· मुले तंतुसारखी , अपस्थानिक मुळे

· पानांचा शिराविण्यास समांतर असतो.

· फुल त्रीभागी.

· उदा. गहू, तांदूळ, मका, ज्वारी, ऊस, गवत, बांबू , कांदा,लसून, कर्दळी, केली, पाम, ऑर्कीड

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...