🅾️परत्येकाने स्वत:पुरते व स्वतंत्रपणे कार्य न करता, अनेकांनी एकत्र व परस्पर सहाय्याने कार्य करणे, हा सहकार या शब्दाचा साधा नि सोपा अर्थ आहे.
म्हणजे समान आर्थिक व्यवहार करू इच्छिनारे लोक एकत्र येतात व ते परस्परांना मदत करून आपल्या गरजा भागविण्याचे उद्दीष्ट पार पाडतात.
अशा प्रकारे सांघिक हित (Collective Good) साध्य करतांना वैयक्तिक हित (In-dividual Good) आपोआपच सिद्ध होते.
🧩सहकार - व्याख्या..
🅾️सहकाराच्या अनेक तज्ज्ञांनी व्याख्या केलेल्या आहेत. एच. कलव्हर्टयांची व्याख्या सोपी व सूटसुटीत असल्याने सर्वमान्य आहे.
🅾️ "आपल्या स्वत:च्या आर्थिक उन्नतीसाठी ज्यावेळी अनेक व्यक्ती स्वेच्छेने, समानतेच्या भूमिकेवरून मनवतेच्या नात्याने संघटित होतात, त्यास सहकार असे म्हणतात."
🧩सहकारी संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये
🅾️सहकारी संस्थांची संघटना अन्य प्रकारच्या व्यवसाय संघटनांपेक्षा (उदा. भागीदारी संस्था, संयुक्त भांडवली संस्था) वेगळी असते.
🧩सहकारी संघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे -
1. नोंदविलेली संस्था -व्यक्ती स्वत: उत्स्फूर्तपणे एकत्र येवून कोणत्याही प्रकारची सहकारी संस्था स्थापन करू शकत असले तरी प्रचलित सहकारी कायद्यांतर्गत तिची नोंदणी करावी लागते.
2. स्वतंत्र व कायमचे अस्तित्व -
🅾️नोंदणी केल्यानंतर सहकारी संस्थेला स्वतंत्र अस्तित्व आणि कायद्याच्या दृष्टीने कृत्रिम व्यक्तीचे स्थान व दर्जा मिळतो. त्यानुसार तिला करार करता येतो, मालमत्ता धारण करता येते, कर्ज उभारते येते. तसेच, न्यायालय जाता येते.
3. ध्येय आणि उद्देश -
🅾️सभासदांच्या समान गरजा भागवणे, त्यांचे आर्थिक कल्याण साध्य करणे हा सहकारी संस्थेचा उद्देश असतो.मात्र एक सामाजिक संघटन या नात्याने तिला समाजाच्या आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक विकासाचाही उद्देश बाळगावा लागतो.
4. सभासदत्व -
🅾️सहकारी संस्थेचे सभासदत्व खुले व ऐच्छिक असते. त्यासाठी जात, धर्म, पंथ, गरीब-श्रीमंत, प्रतिष्ठा इ. च्या आधारे भेदभाव केला जात नाही. तसेच, सदस्यत्वासाठी सक्ती वा बळजबरी केली जात नाही.
5. मालकीहक्क व व्यवस्थापन -
🅾️सर्व भागधारक हेच सहकारी संस्थेचे मालक असतात व तिच्या व्यवस्थापनाचे सर्व हक्क त्यांच्याकडे असतात.मात्र ते वारंवार एकत्र येवू शकत नाही, म्हणून संस्थेचा कारभार चालविण्यासाठी ते स्वत:च्या वतीने व्यवस्थापक/संचालक मंडळ निवडून देतात.सभासदांना मतदानाचे अधिकार "एक व्यक्ति-एक मत" या तत्वानुसार मिळतात.
6. जबाबदारीचे स्वरूप -
🅾️सहकारी संस्थेला अमर्यादित तसेच, मर्यादित जबाबदार्यांपैकी कोणत्याही एका प्रकारच्या जबाबदारीची निवड करावी लागते.
7. भांडवल उभारणी -
🧩सहकारी संस्था भांडवल उभारणी दोन प्रकारे करते -
i) अंतर्गत मार्गांनी -
🅾️यात भाग-भांडवल, राखीव निधी, प्रवेश फी, देणगी इत्यादींचा समावेश होतो. पैकी भाग-भांडवल सर्वात महत्वाचे असते.सहकारी संस्थेचे भाग हस्तांतरक्षम असले तरी ते फक्त सभासदलाच हस्तांतरित करता येतात.तसेच, भागाची दर्शनी किंमत व विक्री किंमत नेहमीच समान असते व या भागांची शेअर बाजारात खरेदी-विक्री केली जात नाही.
ii) बाह्य मार्गानी -
🅾️यात ठेवी, कर्जे, कर्ज रोख्यांची विक्री, सरकारी अनुदाने/कर्जे यांचा समावेश होतो.सहकारी संस्था, सभासद तसेच, बिगर-सभासद यांच्याकडून ठेवी गोळा करू शकतात.
8. नफ्याची विभागणी -
🅾️सहकारी संस्था नफ्याच्या उद्दिष्टाने स्थापन झालेल्या नसतात.मात्र, आधुनिक सहकारी तत्वानुसार नफा वा आधिक्याचे न्याय वाटप करण्यावर भर देण्यात आला आहे.सभासदांच्या भाग-भांडवलावर किती व्याज म्हणजेच लाभांश द्यावा हे सहकारी कायद्याने ठरवून दिलेले असते.महाराष्ट्रातील सहकारी संस्था भाग-भांडवलावर 12 टक्के रोखीने व विशेष परवानगीने 18 टक्के पर्यंत लाभांश देऊ शकतात.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
No comments:
Post a Comment