Tuesday, 7 February 2023

शेरिफ/नगरपाल



- ब्रिटिशांच्या राज्यव्यवस्थेमधील एक महत्त्वाचे शासकीय पद.
- नॉर्मन लोकांनी इ. स. १०६० मध्ये संपूर्ण इंग्लंड पादाक्रांत करण्याच्या आधीपासून इंग्लंडमध्ये परगणे, महानगरे व इतर शहरांसाठी शेरीफ या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येई व आजतागायत हे पद भारतातही कायम आहे
- पारंपरिक दृष्टीने प्रतिष्ठेचे परंतु दिखाऊ स्वरूपाचे अराजकीय स्वरूपाचे मानद पद आहे.
- सध्या भारतातील तीन शहरात हे पद अस्तित्वात आहे, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता
- शहराच्या महापौरांच्या खालोखाल या पदाचा मान असतो

● मुंबईचा शेरिफ/नगरपाल

- मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयाची स्थापना लेटर्स पेटंट ॲक्ट 1823 अनुसार झाली. मुंबईचे शेरिफ (नगरपाल) कार्यालयाचे कामकाज लेटर्स पेटंट ॲक्ट, 1823 अनुसार तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई नियम व नगर दिवाणी व सत्र न्यायालय, नियमानुसार चालते.
- मुंबईचे पहिले शेरिफ भाऊ दाजी लाड होते

● नेमणूक & पदावधी

- मुंबईचे नगरपाल (शेरिफ) यांची नियुक्ती महाराष्ट्राचे राज्यपाल मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शिफारसीनुसार करतात. मुंबईचे नगरपाल (शेरिफ) यांचा नगरपाल (शेरिफ) पदाचा कालावधी एक वर्षाचा (20 डिसेंबर ते 19 डिसेंबर पर्यंत) असतो.

● कर्तव्ये व जबाबदाऱ्या

- मुंबईचे नगरपाल (शेरिफ) हे पद 1897 पासून मानद स्वरुपाचे आहे.
- शेरीफ हे सार्वजनिक समारंभात कार्यशील असल्याने, जेव्हा जेव्हा शासनाकडून विनंती केली जाते, तेव्हा तेव्हा विशेष मान्यवर व्यक्तींचे ते मुंबई विमानतळावर स्वागत करतात व निरोप देतात.
- मुंबईच्या जीवनातील सर्व क्षेत्रातील बहुसंख्य नागरिकांनी जर तशा प्रकारचे निवेदन दिल्यास, प्रमुख नागरिकांच्या झालेल्या निधनाबददल शोक व्यक्त करण्यासाठी मुंबईतील शहरवासियांच्या सार्वजनिक शोकसभासुध्दा बोलावतात.
- मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई यांच्या विनंतीनुसार मुंबईचे नगरपाल (शेरिफ) मुंबईतील तुरुंगाना भेटी देतात.
- मुंबई शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले योगदान देतात.

● नगरपाल कार्यालयाचे कामाचे स्वरुप

- मुंबईच्या शेरिफांचे कार्यालय हे आदेशिका बजाविणारे आणि अंमलबजावणी करणारे खाते असून ते उच्च न्यायालय व शहर दिवाणी न्यायालय, मुंबई, सहकार न्यायालय, मोटार अपघात दावा प्राधिकरण यांनी काढलेली समन्स, नोटीसा आणि अधिपत्रे बेलीफांमार्फत बजावते आणि त्यांची अंमलबजावणी करते.
- डिक्रीधारकांनी दाखल केलेल्या हुकूमनाम्याची अंमलबजावणी करताना स्थावर व जंगम मिळकत जप्त करुन हुकूमनाम्यांची वसुली सार्वजनिक लिलाव करुन करते.
- हे कार्यालय उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशिका यावर फी गोळा करते व उच्च न्यायालयाच्या हुकूमनाम्याच्या वसुलीवर 1% वटणावळ वसूल करते.
- मुंबईचे शेरिफ कार्यालयाचे कार्यक्षेत्र कुलाबा ते मुलुंड, कुलाबा ते मानखुर्द, कुलाबा ते दहिसर पर्यंत आहे. परंतु, मा. न्यायालयांच्या आदेशानुसार हया कार्यालयातील बेलिफांना दिवाणी खटल्यांत प्रोसेसची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई बाहेर तसेच राज्याबाहेर सुध्दा जावे लागते.
- नौअधिकरण क्षेत्राखाली शेरीफ, जहाजे व जहाजी मालमत्ता अटकाव व सुटका करण्याच्या मा. उच्च न्यायालयाच्या अधिपत्रांची अंमलबजावणी करतात व विक्रीची अधिपत्रे काढण्यात आली असतील तर ते जहाज किंवा जहाजीमाल यांचा शेरिफ जाहिर लिलाव करतात.
- नौअधिकरण क्षेत्राखाली उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशिका यांची बजावणी त्यांच्याकडून होते व त्याकरिता एकूण मिळालेल्या रकमेच्या 1% वटणावळ महसूल स्वरुपी शासनाच्या तिजोरित जमा करतात.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...