🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती.
🔰सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने यापूर्वीच दिली.
🔰आता देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या विमानतळाच्या देखबालीचे आणि हाताळणीचे कंत्राट गौतम अदानी यांच्या समुहाला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
🔰अदानी समुहाचा जीव्हीके समुहासोबत असलेला वाद शमल्यानंतर मुंबई विमानतळातील 74 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सध्या मुंबई विमानतळाच्या देखभालीचं आणि हाताळणीचं कंत्राट जीव्हीके समुहाकडे आहे.
No comments:
Post a Comment