Wednesday, 12 August 2020

सामान्य विज्ञान (इयत्ता 5 वी) :



शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात.

 मेंदू, फुफ्फुसे, हृदय, इ. आंतरिंद्रियांची उदाहरणे आहेत.

 अन्नाचे पचन अन्न नलिकेमध्ये होते.

 अन्न पचनास मदत करणार्‍या रसास पाचकरस असे म्हणतात.

 तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते.

 डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने अधिक असतात.

 भुईमुंग, करडई यांसारख्या तेलबियात स्निग्धाचे प्रमाण अधिक असते.

 पालेभाज्यांपासून क्षार व जीवनसत्वे मिळतात.

 मोड येताना धान्यातील जीवनसत्वाचे प्रमाण वाढते.

 आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होऊन पौष्टिकता वाढते.

 ओ.आर.एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो.

 पोटॅशिअम परमॅगनेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात.

 खडकापासून मातीचा 2.5 सेमी पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्ष लागतात.

 डोंगर उतारावर घातलेल्या बांध्ंणा ताली किंवा ओटे म्हणतात.

 पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे मत कणाद महर्षींनी मांडले.

 कणाद महर्षींचा जन्म इसवी सनापूर्वी 6 व्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजेच गुजराथ राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टम येथे झाला.

 पदार्थाच्या सूक्ष्मतिसूक्ष्म कणाला महर्षीनी 'पीलव' म्हटले आहे.

 उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात.
 उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणार्‍या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात.

 लोखंडाप्रमाणेच कोबाल्ट व निकेल हे धातूही चुंबकाकडे आकर्षिले जातात.

 पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणार्‍या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात.

 बाष्पीभवन, सांद्रीभवन, विरघळणे, उत्कलन आणि विलयन हे भौतिक बदलाचे प्रकार आहेत.

 लोखंडी पत्रे, नळ इ. वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावतात.

 तांब्या-पितळेच्या भांड्यांना काथिलाचा लेप देऊन कल्हई करतात.
____________________________________

No comments:

Post a Comment