Friday, 28 August 2020

उडान 4.0 अंतर्गत नवीन 78 मार्गांना मंजुरी


📚नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रादेशिक संपर्क योजनेच्या (आरसीएस) - उडे देश का आम नागरीक (उडान) ने  तीन यशस्वी निविदा प्रक्रियांनंतर चौथ्या फेरी अंतर्गत नवीन 78 मार्गांना मंजुरी दिली आहे.

📚 यामुळे देशातील दुर्गम आणि प्रादेशिक भागातील संपर्क वाढू शकेल. नवीन मार्गांची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये ईशान्येकडील प्रदेश, डोंगरप्रदेशातील we राज्ये आणि बेटे यांना प्राधान्य देण्यात आले आहे.

📚गवाहाटी ते तेजू, रुप्सी, तेजपूर, पासीघाट, मीसा आणि शिलाँग या मार्गांसह ईशान्येकडील जोडणीला विशेष चालना देण्यात येत आहे. उडानच्या या चार मार्गांतर्गत नागरिकांना हिसार ते चंदीगड, डेहरादून आणि धर्मशाला या मार्गांवर प्रवास करता येईल. वाराणसी ते चित्रकूट आणि श्रावस्ती मार्गाला देखील मंजुरी मिळाली आहे.

📚 उडान 4.0 योजनेअंतर्गत नव्या मार्गांमध्ये लक्षद्वीपमधील अगत्ती, कवरत्ती आणि मिनिकोय बेटे देखील जोडली गेली आहेत.

📚आजवर, उडान योजनेअंतर्गत 766 मार्ग मंजूर झाले आहेत. पैकी 29 वापरातील, 08 वापरात नसलेले आणि 02 कमी वापरात असलेले विमानतळ यांचाही मंजूर मार्गांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

📚ईशान्येकडील क्षेत्र, डोंगर प्रदेशातील राज्ये आणि बेटांवर विशेष लक्ष केंद्रित करून डिसेंबर 2019 मध्ये उडानची चौथी फेरी सुरू करण्यात आली. एएआय च्या वतीने यापूर्वीच विकसित केलेल्या विमानतळांना या योजनेअंतर्गत व्हीजीएफसाठी (अनुदान सहाय्यतून सक्षमीकरण) प्राधान्य दिले आहे. उडान 4, अंतर्गत हेलिकॉप्टर आणि सी-प्लेन्सचे कामकाज देखील समाविष्ट केले गेले आहे.

📚सथापनेपासून नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने 274 उडान मार्ग चालू केले आहेत, जे 45 विमानतळ आणि 3 हेलिपोर्टला जोडले गेले आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...