Sunday, 30 August 2020

भारतात 2036 साली स्त्रियांची संख्या अधिक असणार: राष्ट्रीय लोकसंख्या आयोग.



♒️आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाने 15 वर्षांसाठी लोकसंख्येचा अंदाज दर्शविणारा एक अहवाल तयार केला आहे. अहवालात वर्ष 2011 ते वर्ष 2036 मधील लोकसंख्येविषयी अंदाज दिला आहे.

♒️2011च्या लोकसंख्येच्या तुलनेत 2036 साली स्त्रियांची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक असणार, असे अभ्यासातून दिसून आले आहे.

✴️अहवालातल्या ठळक बाबी...

♒️दशातले सरासरी लिंग गुणोत्तर (1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या) 2011 साली 943 होते. ते 2036 साली 957 होण्याची अपेक्षा आहे.

♒️2011च्या तुलनेत 2036 साली केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात वगळता अठरा राज्यांमधले लिंग गुणोत्तर वाढणार.
2036 साली दिल्ली केंद्रशासित प्रदेशात 899 एवढे सर्वात कमी लिंग गुणोत्तर असण्याचा अंदाज आहे. हे प्रमाण गुजरात आणि हरयाणामध्ये अनुक्रमे 900 आणि 908 राहणार.

♒️नवजात मृत्यु दर (IMR) 2031-35 पर्यंत 30 पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, जी सर्व राज्यांमध्ये दिसून येणार.2036 पर्यंत भारताची लोकसंख्या 151.8 कोटी पर्यंत जाणार.

♒️एकूण जनन दर (TFR) 2011-15 या कालावधीमधील 2.34 वरून घटून 2031-35 या कालावधीत 1.72 होणे अपेक्षित आहे.वर्ष 15-24 या वयोगटातल्या तरुणांची संख्या 2036 पर्यंत 22.7 कोटी असणार, जे की 2036 मधील एकूण लोकसंख्येच्या 14.9 टक्के राहणार.

No comments:

Post a Comment