Sunday, 16 August 2020

संरक्षण मंत्रालयाचे ‘संरक्षण सामग्री उत्पादन व निर्यात विस्तार धोरण 2020’



"आत्मनिर्भर भारत मोहीम" याच्या अंतर्गत देशाला संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याला चालना देण्यासाठी विविध घोषणा करण्यात आल्या.

देशाला संरक्षण तसेच अंतराळ विज्ञान क्षेत्रात जगात अव्वल देशांच्या यादीत भारताचे नाव समाविषतः करण्याच्या उद्देशाने, संरक्षण मंत्रालयाने ‘संरक्षण सामग्री व निर्यात विस्तार धोरण 2020’ याची रचना केली आहे.

हे संरक्षण मंत्रालयाचे महत्त्वाचे मार्गदर्शक दस्तऐवज असून त्यायोगे संरक्षण सामुग्री क्षेत्रात स्वयंपूर्ण होणे आणि निर्यात वाढवणे ही उद्दिष्टे साकार करण्याचे उद्दिष्ट आहे.

📚 धोरणाची उद्दिष्टे...

2025 सालापर्यंत एकूण 1 लक्ष 75 हजार कोटी रुपयांची उलाढाल करण्याचे उद्दिष्ट गाठणे, ज्यात उड्डयन तसेच संरक्षण सामग्री व सेवा क्षेत्राचा वाटा 35,000 कोटी रुपयांचा असणार.

सशस्त्र दलांना उत्तम दर्जाची उत्पादने पुरविण्यासाठी, उड्डयन, नौदलासाठी जहाज बांधणी तसेच संरक्षण क्षेत्रात गतिमानता, मजबूतीकरण व स्पर्धात्मकता आणण्यासाठी संरक्षण उद्योग विकसित करणे.

आयात केलेल्या परदेशी मालावर विसंबून न रहाता स्वदेशी संरचना आणि उत्पादने विकसित करीत मेक इन इंडिया मोहिमेचा पुरस्कार करणे.

संरक्षण सामुग्री निर्यात करून जगाच्या संरक्षण मूल्य साखळीचा हिस्सा बनणे.
संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वातावरण तयार करून नवनिर्मितीला पुरस्कृत करणे, भारतीय बौद्धिक संपदेची मालकी तयार करणे तसेच मजबूत आणि स्वयंपूर्ण संरक्षण उद्योगाला चालना देणे.विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेल्या बाबी

खरेदीतली सुधारणास्वदेशीकरण आणि एमएसएमई वा स्टार्टअप उद्योगांना आधार देणेसंसाधनांचे योग्य वाटपगुंतवणूक, थेट परकीय गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरण यांना प्रोत्साहननवनिर्मिती, संशोधन आणि विकाससंरक्षण क्षेत्रातले सार्वजनिक उपक्रम (DPSUs) आणि आयुध उत्पादन मंडळ  (OFB)गुणवत्ता हमी आणि चाचणीकरीता पायाभूत सुविधानिर्यातीला प्रोत्साहन.

No comments:

Post a Comment